खुटसावरी येथील भव्य सेवक सम्मेलन, जागरण व सामुहिक हवन कार्य संपन्न
✍भवन लिल्हारे ✍
मोहाडी तालुका पत्रकार
📱८३०८७२६८५५📱
📱८७९९८४०८३८📱
मोहाडी:- भंडारा जिल्हा मोहाडी तालुका अंतर्गत येणाऱ्या खुटसावरी गावात आज दिनांक १७ फेब्रुवारी रोज गुरुवारला मानव जागृती, धर्म रक्षण, सामाजिक विकास, व्यसनमुक्ती आणि अंधश्रद्धे पासुन मुक्त करुन गोरगरीब दुःखी मानवाला मार्गदर्शन करणारे मानव धर्माचे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या कृपेने दुःखी कष्टी गरीब मानवास भगवत प्राप्तीचा परिचय करुन देणारे व सर्व वाईट व्यसनातून मुक्त करुन सुखमय जिवन जगण्याची प्रेरणा देणारे मानव धर्माचे प्रचार प्रसार निमित्य सामुहिक हवन कार्य व सेवक सम्मेलन जागरण सोहळा पार पडले,
या कार्यक्रमात प्रामुख्यानं उपस्थित ब. उ. प.पुज्य परमात्मा एक चे अध्यात्मिक प्रमुख मानव धर्म प्रचार व प्रसारिका म्हणून लाभलेले सौ.लताबाई दिलीपजी बुरडे हि कार्यक्रमाचे उदघाटिका म्हणुन लाभले, कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. यशवंतरावजी म. ढबाले (ब.उ.प.पुज्य परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडी) सचिव श्री.मोरेस्वरजी सार्वे (ब. उ. प. पुज्य परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडी) संचालक श्री. शिशुपालजी माटे (ब. उ. प. पुज्य परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडी) मार्गदर्शक म्हणुन श्री. सदारामजी लिल्हारे मांडेसर,हे प्रामुख्याने उपस्थित झाले.
प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणारे सौ. त्रिशुलाबई दमाहे ग्रा. पं. सरपंच, श्री. अनिलजी बिरणवारे उपसरपंच, त.मू. अध्यक्ष श्री. बिरनजी दमाहे, सामाजिक कार्यकर्ते विजयजी पशिने, मा. सरपंच श्री.देवदासजी लिल्हारे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चे मुख्याध्यापक श्री. अनिलजी गयगये, से. स. सो. सचिव श्री.शेवकजी बशिने,से.स.सो. वि. कार्यकारी अध्यक्ष श्री. नरेशजी बिरनवार,हे उपस्थित होते,
कार्यक्रमाचे आयोजक यांनी सकाळी ४: ०० वा. गावामध्ये ग्राम स्वच्छता अभियान राबविले, सकाळी ८: १० ते ९:०० वा. सामुहिक हवन कार्य संपन्न केले, सकाळी ९:३० ते १२:३० वां. हनुमान झाकी ची शोभा यात्रा काढली,दुपारी १२:३० ते १:३० वा. आलेले पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले, दुपारी १:३० ते ३:३० वा. महानत्यागी बाबा जुमदेवजी च्या शिकवनिवर मार्गदर्शन करणारे मानव धर्माचे प्रचार प्रसार करीता येथे आलेल्या पाहुण्याने भगवंताची प्राप्ती करून वाईट विचारांचा नायनाट होते, वाईट भावनांचा नाश होतो, अशा बाबांचा आणि सेवकांचा आत्मनुभव आहे, म्हणुन या मार्गामध्ये लोकांची धाव आहे, मार्गामुळे दुष्ट भावनेचा आणि अंधश्रध्देचा नाश होतो, जीवनाची अनेक पुजा बंद करून मनाची एकाग्रता,एकचित्त ,एकलक्ष,एक परमेश्वर आहे, असे बाबाने शिद्ध केले आहे, काही स्वार्थी लोकांनी मानवाच्या मनात शंकाकुशंका निर्माण करुन लोकांच्या मनात भिन्न भिन्न विचार निर्माण केले आहे,त्या कारणाने आत्मशक्ती आणि आत्मबल कमजोर झाले आहे, म्हणुन मानवी जीवनात मनाची एकाग्रता हाच परमेश्वरी प्रवाह मानवामध्ये तयार होतो व तोच प्रचिती देतो, आत्मशक्ती वाढवितो, शंकाकुशंका नष्ट होतात, आणि आत्मबल वाढते आणि भगवंत परमेश्वर हा आपल्या जवळ राहतो, आणि मानव आपले भविष्य उज्ज्वल करतो,
असे आलेल्या पाहुण्यांनी सेवक सेविकांना आपल्या भासणातून मार्गदर्शन केले, व शेवटी मानव धर्म प्रचार प्रसार व प्रसारिका अध्यात्मिक प्रमुख अतिथी सौ. लताबाई बूरडे यानी सत्य बोला,मर्यादा पाळा, प्रेमाने वागा, राग आणणे बंद करा, शब्द पाळा, निंदा करू नका, दारु पिऊन धिंगाणा करु नका, जुगार खेळू नका, वाईट व्यसन बंद करा, उसनवारी करु नका, अंथरूण पाय पसरा, स्वावलंबी बना, अड्यामार्गणे श्रीमंत बनण्याचा प्रयत्न करु नका, दुसऱ्यांच्या आत्म्याला दुखावू नका,एकच भगवंत माना, बाबांच्या आदेशांचे वेळोवेळी पालन करा, हि चर्चा बैठक एक भक्ती आहे, महानत्यागी बाबा जूमदेवजीने भगवंताच्या प्रप्तिकरिता निष्काम कर्मयोग साढण्याकरिता जे चार तत्व दिले आहेत,त्याचा अभ्यास करून भगवंताचे महान गुण म्हणजे सत्य,मर्यादा व प्रेम प्राप्त करून नियमा प्रमाणे चाला,हा संदेश चर्चा बैठकीत मिळतो, तत्वाचा शब्दाशी, शब्दाचा नियमाशी, नियमाचा अनुभवाशी लक्ष साधुन परमेश्वरी कृपेची ओळख करून घ्या, आणि आलेल्या अनुभवानुसार इतर शेवकाना तरणोपाया कडे वळविण्याचा प्रयत्न करत राहा, हाच खरा चर्चा बैठकीचा खरा उद्देश आहे, अशी समज देऊन त्यांनी आपले प्रवचन थांबविले.
या कार्यक्रमात प्रामुख्यानं उपस्थित राहणारे आयोजक (मा. श्री.बाबुलालजी दमाहे ब. उ. प. पुज्य परमात्मा एक सेवक मंडळ खुटसावरी चे अध्यक्ष) श्री. पवन बशिने (उपाध्यक्ष)श्री. विजयजी दमाहे (सचिव)आणि संपुर्ण सेवक, सेविका, बालगोपाल व खुटसावरी ग्रामवासि यांचे आभार व्यक्त केले, व प्रसाद वाटप करुन महाप्रसाद वितरण करण्यात आले, व सायंकाळी ७: ३०वा. आक्रेस्टा जागरण गृप श्री. मुकेश जी नगपूरे मूं. लळसळा, तहसील- वारासिवणी, जिल्हा- बालाघाट, यांच्या माध्यमातून मानव धर्म, रक्षण, सामाजिक विकास, व्यसनमुक्ती, यांच्यावर प्रबोधन करण्यात आले.
या कार्यक्रमात प्रामुख्यानं उपस्थित राहणारे आयोजक, व सुत्र संचालन करणारे मानव धर्माचे सेवक श्री. विजयजी दमाहे, यांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत व आभार मानले, आणि कार्यक्रम समाप्त करण्याची घोसणा केली,