जय जवान जय किसान संघटने तर्फे स्मशान भुमी रस्त्याचे स्वच्छता अभियान संपन्न
✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
📱7620512045📱
लाखणी/भंडारा: शहरातील एकमेव अश्या स्मशानभूमी कडे जाणाऱ्या रस्त्यावर वैनगंगा नदीच्या बॅक वाटरमूळे पाणी साचून त्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गाळ, वृक्षवेली आणि घानकचरा जमा झाल्यामुळे स्मशान भुमीकडे जाण्यायेण्यास अडथळा निर्माण होत होता व नागरिकांची गैरसोय होत होती. करिता जय जवान जय किसान संघटने च्या माध्यमातून नागरीकांना आव्हान करून रस्ता स्वच्छता करण्याचा अभियान राबविण्यात आला.
जय जवान जय किसान संघटने च्या आव्हानाप्रतिसाथ देत मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहून रस्ता स्वच्छ करण्यात मदत केली.
मागील काही दिवसा अगोदर जय जवान जय किसान संघटनेच्या माध्यमातून भंडारा नगरपरिषदेवर लक्षवेधी असा प्रेतयात्रा काढून हल्ला बोल आंदोलन करण्यात आले होते व त्यांची चौदावी म्हणून आज हा स्वच्छता अभियान राबविण्यात आला.
यावेळी सचिन घनमारे, जिल्हाध्यक्ष जय जवान जय किसान, अरूण भाऊ भेदे जिल्हा संघटक, वसीम ( टिंकू) खान जिल्हा अल्प संख्यक अध्यक्ष, सचिन बागडे शहराध्यक्ष,लोकेश खोब्रागडे, सौ. भारती लिमजे महिला शहर अध्यक्ष,तालुका अध्यक्ष सुगत शेन्डे,आसीफ पटेल,शहर महासचिव सचिन शहारे, गिरीश कुंभरे,पराग खोब्रागडे, साजन हुमने,मोनु रामटेके, प्रशांत सरोजकर, लक्ष्मण कनोजीया , रूपचंद नागपुरे, जुनेद खान, फराज खान, खिजर खान, नासीर कुरैशी, अजीम कुरैशी, आमीर शेख, रॉबिन खडसे, शुभम हापसे, शुभम मेश्राम, मुकेश बांबोडे, विनय बन्सोड इ. पदाधिकारी व शहरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.