पोंभुर्णा नगर पंचायतीवर भाजपाचा झेंडा
अध्यक्षपदी सुलभा पिपरे तर उपाध्यक्षपदी अजित मंगळगिरीवार
हस्तक वाळके
तालुका प्रतिनिधि
9503528789
पोंभुर्णा नगर पंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणूकीत भाजपाचा झेंडा फडकला असून अध्यक्षपदी भाजपाच्या सुलभा पिपरे तर उपाध्यक्षपदी अजित मंगळगिरीवार यांची निवड झाली आहे. पोंभुर्णा नगर पंचायतीच्या नवनियुक्त अध्यक्ष व उपाध्यक्षांचे विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, सरचिटणीस संजय गजपुरे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा अलका आत्राम, जिल्हा परिषद सदस्य राहूल संतोषवार, पंचायत समिती उपसभापती ज्योती बुरांडे, श्वेता वनकर माजी नगराध्यक्ष पोंभुर्णा, नंदा कोटरंगे, आकाशी गेडाम, शारदा गुरनुले, लक्ष्मण कोडापे, रोहिणी ढोले,उषा गोरंतवार, दर्शन गोरंटीवार, आदींनी अभिनंदन केले आहे.