शुक्रवार दि १८ फेब्रुवारी २०२२ रोजी किल्ले सज्जनगड ते दक्षिण काशी पर्यंत मशाल दौडचे सकाळी ११ वाजेपासून सुरू

मीडिया वार्ता न्युज
१८ फेब्रुवारी, सातारा:दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या वाई येथील पसरणी मध्ये रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठानच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त शिवजयंती उत्सव आणि मशाल दौड त्याचबरोबर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्षा अश्विनीताई महागंडे यांनी छत्रपती शिवरायांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रतिष्ठानची स्थापना केली असून मागील दोन वर्षात त्यांनी विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून दाखवून दिले आहे.
हे आपण वाचलंत का?
- पुण्यात उद्यापासून सुरु होणार रसाळ द्राक्षांचा महोत्सव
- मतदानाबद्दल जनजागृती करणारे विडिओ, गाणी,चित्रे बनवा आणि जिंका लाखो रुपये, नक्की वाचा
सातारा जिल्ह्यातील सर्वात मोठी भव्यदिव्य शिवजयंती दक्षिण काशी वाई येथे सुरू करून इतिहास निर्माण केला आहे. सामाजिक शैक्षणिक,गडकिल्ले संवर्धन त्यांचे जतन करण्याचा विडा संस्थेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. यावेळी शुक्रवार दि १८ फेब्रुवारी २०२२ रोजी किल्ले सज्जनगड ते दक्षिण काशी पर्यंत मशाल दौडचे सकाळी ११ वाजेपासून सुरू होईल.
शनिवारी शिवजयंती उत्सव कार्यक्रमावेळी शिवरायांच्या वेळी स्वराज्य निर्माण करताना कोणत्या शस्त्राचा वापर केला गेला हे सर्वसामान्यांना समजावे यासाठी “शस्त्र प्रदर्शन” , महिलांसाठी सॅनिटायझर नॅपकिनचे मोफत वाटप कार्यक्रम आणि मान्यवरांचे स्वागत करण्यात येणार आहे.
https://www.instagram.com/p/CaGz8sWN2HV/
या कार्यक्रमाला राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई,यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. असे संस्थेच्या अध्यक्षा अश्विनीताई महागंडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.