कुटुंबाकडुन जिवेनिशी मारण्याचा प्रयत्नः तक्रार करुनही पो.स्टे.नागभीडचे दुर्लक्ष पञकार परिषदेत मांडली कैफियत
*अरुण रामुजी भोले*
*नागभीड तालुका प्रतिनिधी*
*9403321731*
नागभीड -तालुक्यातील चिकमारा येथील बाळकृष्ण रामटेके वय ६२ वर्षे यांना कुटुंबातील लोकांकडुन मारहाण होत असल्याचा आरोप त्यांनी पञकार परीषदेत केला आहे. पत्नी आणी मुलांकडुन वारंवार ञास होत असल्याने त्यांनी अनेकदा पोलीस स्टेशन येथे तक्रारी दाखल केल्या. परंतु कोणत्याही प्रकारची पोलीस दखल घेत नाही. त्यामुळे माझ्या कुंटुबाकडुनच माझ्या जिवीताला धोका आहे. माझे स्वताचे मकान व शेती असुन मलाच माझ्या घरात राहता येत नाही. पत्नी व मुलांकडुन मला शारीरीक, मानसीक ञास दील्या जातो. या बाबत नागभिड पोलीस स्टेशन ला 2015 तक्रार केली होती,थातुर -माथूर चौकशी केली होती, कुटुंबाकडूण वरील प्रमाणे ञास देणे सुरुच आहे,ञासामुळे सन २०१८ मध्ये भिक्कु संघात प्रवेश केला. माञ गावात आल्यानंतर मला घरी राहु देत नाही. माझे स्वताचे मकान असतांनी मला दारोदार भटकावे लागते.मला तु कोणताही कामधंदा करत नाही म्हणून आरोप करतात. या बाबतचे अनेक लेखी तक्रार नागभीड पोलीस स्टेशनला दिल्या परंतु कोणत्याही प्रकारची दखल घेतल्यात जात नाही. सन २०१५ पासुन ते सन जानेवारी २०२२ प्रयंत अनेक तक्रारी दिल्या पण पोलीस विभागाकडुन मौका पंचनामा केला नाही.उलट मलाच कोर्टात जा म्हणतात असा आरोप बाळकृष्ण रामटेके यांनी पञकार परिषदेतुन केला आहे. माझ्या जिविताचे बरे वाईट झाल्यास पोलीस स्टेशन जबाबदार राहील. तसेच माझ्या तक्रारीची दखल न घेणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी असी पञकार परिषदेतुन मागणी केली आहे. माझे स्वताचे मकान असुन मला राहता येत नाही.मला दुसऱ्यांचा सहारा घ्यावा लागतो. शेती असुन शेती करु दिल्या जात नाही. त्यामुळे मला आता आत्महत्या केल्या शिवाय पर्याय राहीला नाही.मला न्याय न मिळाल्यास आत्मदहन करण्यात येईल याला जबाबदार शासन प्रशासन राहील असे पञकार परिषदेच्या माध्यमातुन कथन केले आहे.
*प्रतिक्रीया*-
– *राजु मेंढे पोलीस निरिक्षकः* नागभिड- वरील केस बाबत माहिती चा अधिकार मार्फत माहिती मागितली होती,त्यांच्या घरपोच शिपाई गेले वह माहीती दिली असता श्री ,बाळकृण्ण रामटेके यांनी माहिती घेतली नाही, कौटुंबिक वादा मध्ये आम्ही काहीच करु शकत नाही. त्यांनी कोर्टात दाद मागावी. NC रिपोर्ट मध्ये मौका पंचनामा केल्या जात नाही.