सचिन तेंडुलकरने सांगितली विराट कोहलीबद्दलची एक भावनिक आठवण

63
सचिन तेंडुलकरने सांगितली विराट कोहलीबद्दलची एक भावनिक आठवण,

सिद्धांत
१८ फेब्रुवारी २०२२: विराट कोहलीचे नाव सध्या चांगल्या कारणांपेक्षा निराश करणाऱ्या घटनांमुळे चर्चेत आहे. गेल्या वर्षभरात त्याला भारताच्या तीनही फॉरमॅटचे कर्णधारपद सोडावे लागले. त्यातच गेल्या दोन वर्षांमध्ये त्याच्या बॅटमधून एकही शतक न आल्याने क्रिकेटप्रेमी त्याच्या फॉर्मवर चिंता व्यक्त करत आहेत. यादरम्यान सचिन तेंडुलकरने विराट कोहलीच्या सुरुवातीच्या दिवसांची एक भावनिक आठवण माध्यमांद्वारे लोकांनां सांगितली आहे.

सचिन तेंडुलकरच्या शेवटच्या सामन्यानंतरची आठवण
सचिन तेंडुलकर विराट कोहलीबद्दल एक आठवण सांगत म्हणाला कि, मला आठवते कि जेव्हा मी सामना संपल्यानंतर पुन्हा ड्रेसिंग रूममध्ये परतलो, तेंव्हा माझ्या डोळ्यातून नकळतपणे अश्रू वाहायला लागले होते. त्यावेळी मला कळून चुकले कि, भारतीय खेळाडू म्हणून मी पुन्हा कधी मी मैदानांवर जाऊ शकणार नव्हतो.

याच विचार करत मी एकटाच बसलेला असताना, विराट कोहली माझ्याकडे आला आणि त्याने मला त्याच्या वडिलांनी त्याला दिलेला हातातला धागा मला भेट दिला. मी तो थोडा वेळ माझ्याकडे ठेवला आणि त्यांनतर विराट कोहलीला परत केला. त्यावेळी मी त्याला सांगितले होते कि, तुझ्या वडिलांनी दिलेला हा धागा तू सांभाळून ठेव. माझ्यासाठी हा एक भावनिक क्षण होता, आणि तो माझ्या आयुष्यभर स्मरणात राहील.

हे आपण वाचलंत का?

विराट कोहलीचे वडील प्रेम कोहली यांनी विराट कोहलीला वयाच्या तीन वर्षांपासून क्रिकेटचे प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली होती. वयाच्या नवव्या वर्षी त्यांनी विराटला दिल्लीच्या क्रिकेट अकादमी मध्ये दाखल केले. १८ डिसेंबर २००६ साली त्यांचे ह्र्दयविकारामुळे निधन झाले. त्यावेळी विराट कोहली कर्नाटक विरुद्ध रणजी सामना खेळत होता. आदल्या दिवशी तो नाबाद ४० धावांवर खेळात होता. त्या रात्री अडीच वाजता त्यांच्या वडिलांचे निधन झाले.

परंतू दुसऱ्या दिवशी विराट कोहली पुन्हा एकदा मैदानावर उतरला, त्याने ९० धावांची खेळी केली. कोहलीच्या मते या घटनेपासून त्याच्या आयुष्यात मोठा बदल झाला आणि क्रिकेट हेच त्याचे आयुष्य बनले.