रयतेचा राजा छत्रपती शिवाजी राजे यांची ३९२ वी जयंती शिवाजी गृप पाहुनी तर्फे साजरी

51

रयतेचा राजा छत्रपती शिवाजी राजे यांची ३९२ वी जयंती शिवाजी गृप पाहुनी तर्फे साजरी

रयतेचा राजा छत्रपती शिवाजी राजे यांची ३९२ वी जयंती शिवाजी गृप पाहुनी तर्फे साजरी

✍ भवन लिल्हारे ✍
* मोहाडी तालुका पत्रकार *
📱८३०८७२६८५५📱
📞८७९९८४०८३८📞

मोहाडी :- रयतेचा राजा म्हटल की समोर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसर कुठल नाव येत नाही, रयतेचा राजा कसा असावा याचा पायंडा छत्रपती शिवाजी महाराज यांनी रचला, आणि त्यापुढे जाण्याची कोणाची टाप नाही,१९ फेब्रुवारी २०२२ रोज शनिवारला मौजा पाहुनी येथे शिवाजी गृप तर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवभक्त म्हणुन लाभलेले मोहाडी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. श्री. रजेशभाऊ हटवार, मा. श्री. रंजीतभाऊ सेलोकर , मा. श्री. हरिभाऊ धूर्वे, मा. श्री. मंगलभाऊ मेश्राम, मा. श्री. मनोहरभाऊ ताले, मा. श्री. संजयभाऊ पटले व शिवभक्त शिवाजी गृप चे सर्व कार्यकर्ते, व पाहुनी ग्राम वासियांच्या वतीने मा.श्री. राजेश भाऊ हटवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटोला माल्याअर्पण करुन अभिवादन केले.
जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ जय शिवराय बोलून भाषणाला सुरूवात केली, त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, छत्रपति शिवाजी महाराज जयंती साजरी करण्याची सुरुवात १८७० साली महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुण्यात केली. पुण्यापासून १०० किमी अंतरावर असलेल्या रायगडावर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी सोधून काढली, नंतर स्वातंत्र्यसैनिक लोकमान्य टिळकांनी जयंती साजरी करण्याची परंपरा पुढे नेली,
त्या काळात लोकमान्य टिळक जनतेला सोबत घेऊन ब्रिटिश राजवटी विरुद्ध लढा देत होते, याचाच एक भाग म्हणून त्याने छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात सार्वजनिकरीत्या साजरी करण्याचे आवाहन जनतेला केले, याद्वारे त्यांनी लोकांना स्वातंत्र्य चळवळीत एकत्र आणण्यामध्ये मोठे योगदान दिले, छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य आणि योगदान जनतेला नेहमीच प्रेरणा देत असे, यासाठी दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाते.
अद्याप कोरोणाचे संकट पूर्णपणे संपले नसल्याने लोकांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारने या वर्षी देखील छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यावर काही प्रमाणात निर्बंध घातले आहेत, शिवज्योती रन मध्ये फक्त २०० लोक सहभागी होऊ शकतात,तर ५०० लोक कार्यक्रमाला उपस्थित राहू शकतात, असे भाषण देऊन कार्यक्रम समाप्तीची घोषणा केली, व कार्यक्रम संपविण्यात आले, व महाप्रसाद वितरण करण्यात आले.