तीन अल्पवयीन मुलींवर एका 55 वर्षीय नराधमाने केला अत्याचार
त्रिशा राऊत
चिमूर तालुका प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर
Mo 9096817953
चिमूर : – सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की.गिरड पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या सिल्ली येथील खेळत असलेल्या तीन अल्पवयीन मुलींवर 55 वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.याप्रकरणी केशव वानखेडे रा. माकोना सावरी तालुका चिमुर जिल्हा चंद्रपूर यास गिरड पोलिसांनी अटक केली.
पोलिस सुत्रांकडुन मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवार 18 रोजी सायंकाळच्या सुमारास सिल्ली येथे 7 वर्षीय व दोन 6 वर्षीय अशा तीन अल्पवयीन मुली नेहमी प्रमाणे खेळत असताना गावात लोखंडी वस्तूंची दुरुस्तीचे काम करण्यासाठी आलेल्या केशव वानखेडे यांने या मुलींना पैसे देऊन त्यांना गावातील ओसाड बाथरूममध्ये अंधारात नेऊन त्यांच्यावर अत्याचार केला. त्यातील एका मुलीने सुटका करीत पळ काढून घटनेची माहिती आईला सांगितली. हा प्रकार गावातील नागरिकांना माहिती होताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली असता हा नराधम अन्य दोन मुलींवर अत्याचार करताना आढळून आला. नागरिकांनी गिरड पोलिसांना माहिती दिली.
ठाणेदार सुनिल दहिभाते यांनी घटनास्थळी जाऊन केशवला अटक केली. घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलिस अधीक्षक यशवंत सोळंकी, उपविभागिय पोलिस अधिकारी दिनेश कदम यांनी घटनास्थळी भेट देऊन या घटनेची माहिती जाणून घेतली. पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार अन्वये गुन्हा दाखल केला असून तिन्ही मुलींना वैद्यकीय तपासणीकरिता पाठविण्यात आले. पुढील तपास पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलिस अधीक्षक यशवंत सोळंकी, उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश कदम, ठाणेदार सुनिल दहिभाते यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक धनश्री कुटेमाटे व पोलिस कर्मचारी करीत आहेत.