गडचिरोली येथील रक्तदान शिबिरात 30 रक्तदात्यानी केले स्वेच्छा रक्तदान..

60

गडचिरोली येथील रक्तदान शिबिरात 30 रक्तदात्यानी केले स्वेच्छा रक्तदान..

गडचिरोली येथील रक्तदान शिबिरात 30 रक्तदात्यानी केले स्वेच्छा रक्तदान..

✍विनोद कोडापे✍
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
📱8380802959📱

गडचिरोली : -छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्याने दि 19फेब्रुवारी 2022 रोजी भूमी एम्पायर, चंद्रपूर रोड गडचिरोली येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिराचे उदघाटन सामाजिक कार्यकर्ते तथा जिल्हा रक्तदान शिबीर आयोजक श्री. विवेक विरदास मून यांचे हस्ते करण्यात आले. समाज हिताच्या कार्यातून प्रत्यक्ष कृती करून छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य पुढे करत राहण्याचे आवाहन या वेळी श्री. विवेक मून यांनी केले.
सदर रक्तदान शिबिरात श्री. सूरज वणकर, श्री प्रशांत जीवतोडे, श्री. प्रीतम नंदेश्वर,श्री नौ्शाद अली सय्यद,श्री. देवेद्र सहारे, श्री. लोमेश डोंगरे, श्री. रोशन गंदाटे, श्री. पवन मुळे, श्री. आशिक बोरकर, श्री. गौरव गोरघरे, श्री. हर्षल चव्हाण, श्री.साईनाथ बावणे, श्री. सचिन बावणे, श्री. सचिन उंदीरवाडे, सौ. साधना डाकरे, श्री. व्यनकटेश लाकडे, श्री. सतीश काटवे, श्री. अविनाश पाझारे, श्री. राजेंद्र वाघरे, श्री. अजिंक्य गायकवाड, सौ. अरुणा नांदणकर, श्री. नवनीत बाजूरवार, श्री. प्रकाश चिलबुले, श्री. नागेश कुद्रकवार, श्री. गौरव वालदे, श्री. रितिक झाडे, श्री. सागर बोम्मावार, श्री. रितिक लाडे, श्री. भूषण मुळे व विपुल लोणारे या 30जणांनी स्वेच्छा रक्तदान केले. सदर रक्तदान शिबिराचे आयोजन व सहकार्य साठी श्री. सूरज भाऊराव वनकर, श्री. पराग वासुदेव मुळे, श्री. पंकज श्यामराव आनंदवार, श्री. कुंदन सुधाकर त्रिनगरीवार, श्री. विवेक मून, सौ. ग्रीष्मा मून (सामाजिक कार्यकर्ते गड. )डॉ अंजली साखरे मॅडम जिल्हा रक्तसंक्रमन अधिकारी, सौ. विद्या आकनूरवार, सौ. मंगला चंदनखेडे, सौ. शर्मिला जनबंधू तथा भूमी एम्पायर परिवारातील सर्व सदस्य लोकांनी मोलाचे सहकार्य केले.