शिवशाही नवयुवक मित्र परिवार आजनी द्वारा छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

48

शिवशाही नवयुवक मित्र परिवार आजनी द्वारा छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

शिवशाही नवयुवक मित्र परिवार आजनी द्वारा छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

✍ भवन लिल्हारे ✍
* मोहाडी तालुका पत्रकार *
📱८३०८७२६८५५ 📱
📞८७९९८४०८३८📞

रामटेक :- नागपूर जिल्ह्यातील, रामटेक तालुक्यात येणारे ” आजनी ” हे गाव नावाजलेले गाव म्हणुन ओळखी आहे, दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा शिवशाही नवयुवक मित्र परिवार तर्फे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा दिनांक १९ फेब्रुवारी २०२२ रोजी साजरी करण्यात आली.
१९ फेब्रुवारी हा ” शिवजन्मोत्सवाचा दिवस ” शिवशाही नवयुवक मित्र परिवार तर्फे दरवर्षी साजरी करण्यात येतो. ” जगाच्या पाठीवर समतेचे व न्यायाचे राज्य निर्माण करुन माणसातील माणूसपण जागे करणारे मानवतेच्या अस्मितेचे जनक विश्ववंद्य, कुळवाडीभूषण “” छत्रपती शिवाजी महाराज “” यांची ३९२ वी जयंती ग्राम पंचायत कार्यालय आजनी येथे गावातील जेष्ठ विचारवंत, आणि शिवशाही नवयुवक मित्र गृप चे आयोजक मा.श्री.मनोजजी लिल्हारे, ( ग्राम पंचायत सदस्य ) मा.श्री. सजनजी डहारे ( त. मू. अध्यक्ष आजनी ) मा.श्री.संजय नागपुरे ( ग्राम. प. सदस्य ) मा.श्री. मनोज उपराडे, मा.श्री.संजय लिल्हारे( सामाजिक कार्यकर्ते) मा.श्री.प्रमोद तांडेकर ( ग्राम पंचायत परिचारक ) मा.श्री.शामलाल उपराडे ( परिचारक ग्राम पंचायत आजनी ) मा.रवी नागपुरे, भावेश नागपुरे , समीर नांन्हे , सुनील बघेले ,विनोद उपराडे , हर्षपाल बिरनवार ,स्वप्नील उपराडे , श्यामकुमार डहारे , दिवारु नागपुरे अमोल लिल्हारे , हिमांशु बशिने , आशिष डहारे व समस्त शिवभक्त कार्यकर्ते यांच्या हस्ते सर्व प्रथम शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पुजा अर्चना केली. व आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.
स्वराज्य निर्माते बहुजनप्रतिपालक , कल्याणकारी राजे, कुळवाडीभूषण विश्ववंद्य जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९२ व्या जयंती निमित्त त्यांच्या कार्य कर्तुत्वाला त्रिवार वंदन केले. व छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयकार करुन अभिवादन केले,
शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करताना आपल्या सैन्याला घुडस्वारी, दानपट्टे, तलवारबाजी, भाला चालविणे, लठबाजी चालविणे शिकविले होते.
ते लक्षात घेऊन आजनी या गावाची परंपरा पुढे आली व हिमांशु बशिने , व आशिष डहारे यांनी डानपट्टे फेकून आपली कला सादर केली, आणि “” प्रौढ प्रताप पुरंदर महापराक्रमी परमप्रतापी रनधुरंधर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय,”” जय शिवराय, जय शंभुराजे, जय शिवाजी, जय भवानी, असे जैकारा बोलून कार्यक्रम संपविण्यात आहे, व कार्यक्रमात प्रामुख्यानं उपस्थित राहणारे आयोजक व शिवशाही नवयुवक मित्र परिवार गृप यांचे अभिवादन करुन शिवजयंती उत्सव सोहळा पार पडली अशी घोस्ना करुन कार्यक्रम संपविण्यात आले.