नागभीड येथे दुचाकीची धडक एक ठार
*अरुण रामुजी भोले*
*नागभिड तालुका प्रतिनिधी*
*9403321731*
नागभीड : – नागभीड-तुकूम रोडवर दुचाकीस्वाराने उभ्या ट्रकला धडक दिल्याने तो जागीच ठार झाला. ही घटना १९/०२/२०२२ ला रात्री 10=00 वाजता च्या दरम्यान घडली. मृतकाचे नाव श्याम रामभाऊ लांजेवार वय ३५ वर्ष ब्रम्हपुरी असे आहे. सविस्तर वृत्त असे आहे की, श्याम रामभाऊ लांजेवार हा मोटरसायकल क्रमांक एम एच ४३ आर ३२५५ हा नाटक बघण्यासाठी पळसगाव येथे भरघाव वेगाने जात होता .नागभीड- तुकूम मार्गावर नागभीड वरून चंद्रपूर कडे जाणारा ट्रक क्रमांक एम एच ३४ बी ४५७ यांचा तिडके नाला जवळ टायर फुटल्याने ट्रक रस्त्याच्या कडेला उभा करून ट्रक ड्रायव्हर टायर बदलवत असताना भरधाव दुचाकी घेऊन श्याम लांजेवार याने मागून उभ्या ट्रकला ठोस मारली व खाली पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला फिर्यादीच्या रिपोर्टवरुन अपराध क्रमांक क्रमांक ४९/२०२२ कलम २७९,३०४(अ)भादवी गुन्हा दाखल करून पुढील तपास ठाणेदार राजु मेढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक निलेश वाडीवा, पोलीस हवालदार मरस्कोल्हे हे करीत आहेत.