गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

56

गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

*अरुण रामुजी भोले*
*नागभिड तालुका प्रतिनिधी*
*9403321731*

नागभीड : -तालुक्यातील डोंगरगाव येथील युवराज यादोराव शिवणकर वय ३१ वर्षे याने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आज दिनांक २०/०२/२०२२ ला सकाळी आठ वाजता आत्महत्या केली. सविस्तर उत्तर असे आहे की, आज सकाळी आठ वाजताच्या दरम्यान त्याने आपल्या राहत्या स्वतःच्या घरी नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही मृतकाचे आईने नागभीड पोलिस स्टेशन ला तोंड रिपोर्ट दिली आहे. पोलिसांनी पंचनामा करून शव विच्छेदन साठी ग्रामीण रुग्णालय नागभीड मध्ये पाठवले. पुढील तपास ठाणेदार राजु मेढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मरस्‍कोले साहेब, सहाय्यक फौजदार अरूण वारजूरकर, पोलीस उपनिरीक्षक वैभव कोडवते करीत आहेत . फिर्यादी च्या तोंडी रिपोर्ट वरून पोलिसांनी मार्ग क्रमांक ०६/२२, १४४ कलम नोंद करून पुढील तपास करीत आहेत.