रयतेचे राजे “छत्रपती शिवाजी महाराज” यांच्या जयंतीनिमित्त १०वी व १२वी  वर्गातील विद्यार्थ्यांना मागर्दशन शिबीर

54

रयतेचे राजे “छत्रपती शिवाजी महाराज” यांच्या जयंतीनिमित्त १०वी व १२वी  वर्गातील विद्यार्थ्यांना मागर्दशन शिबीर

रयतेचे राजे "छत्रपती शिवाजी महाराज" यांच्या जयंतीनिमित्त १०वी व १२वी  वर्गातील विद्यार्थ्यांना मागर्दशन शिबीर

गुणवंत कांबळे, मुंबई प्रतिनिधी
मो. नं.९८६९८६०५३०

मुंबई – लॉकडाऊन काळात शाळा महाविद्यालय बंद असल्या कारणाने अनेक विद्यार्थ्यांवर याचा परिणाम झाल्याचे आपणांस दिसते.हा विचार लक्षता घेऊन “लोकसत्ताक स्टडी सेंटर” भांडूप येथे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त १०वी व १२वी तसेच इतर सर्वच वर्गातील विद्यार्थ्यांनसाठी मागर्दशन शिबीर आयोजित करण्यात आले होते. मा. नेहा सुर्वे यांनी गौतम बुद्ध यांना पुष्पहार अर्पण केले  , मार्गदर्शक प्रा. मा समीर मोहिते सर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले , मा रामचंद्र जाधव सर यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले तसेच मा. निलेश सोनावणे सर यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले. मार्गदर्शक मा समीर मोहिते सर यांचे स्वागत पंचशील धम्म क्रांती मित्र मंडळ अध्यक्ष मा रामचंद्र सर यांनी केले तसेच कार्यक्रमाची सुरुवात संविधानाची प्रस्ताविका वाचून करण्यात आली भारतीय संविधान प्रस्ताविकेचे वाचन प्रतिक वणे या १२, वीच्या विद्यार्थ्याने केले.
सदर शिबर समाजकार्य महाविद्यालय निर्मला निकेतनचे प्राध्यापक तसेच संस्थापक-अध्यक्ष उपजीविका फाऊंडेशन प्रा. मा.समीर मोहिते सर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले . सरांनी विद्यार्थ्यांना अतिशय प्रेमळ स्वभावाने मार्गदर्शन केले, प्रत्येक मुलांची ओळख करून घेतली तसेच कोणाला काय माहित आहे आणि विद्यार्थी कश्या पद्धतीने अभ्यास करतात तसेच त्यांच्या आवडी-निवडी काय आहेत हे जाणून घेतले . ऑनलाईन शिक्षण आवडते का ? आवडते तर का आणि नाही आवडत तर का असे अनेक प्रश्न  विचारून त्यांच्या प्रश्नांचे निरसारण केले.तसेच वाचनाची आवड काशी निर्माण करायची केलेला अभ्यास कसा लक्षात  ठेवायचा यांची माहिती दिली. विद्यार्थ्यांनाच नाही तर पालकांना देखील सरांची मागर्दशन करण्याची पद्धत फार भावली . भारतीय लोकसत्ताक संघटना अध्यक्ष मा अमोलकुमार बोधिराज सर यांनी विद्यार्थ्यांना थोड्याच शब्दात काही मौलिक गोष्टी सांगितल्या तसेच अब्राहम लिंकन बद्दल माहिती देऊन विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले.मा सुर्वे सर यांनी विद्यार्थ्यांना सल्ला देऊन तसेच सर्वांचे आभार मानून  कार्यक्रमाची सांगता केली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन भारतीय लोकसत्ताक विद्यार्थी संघाचे अध्यक्ष मा. मनिष जाधव सर यांनी केले.