रांचीच्या न्यायालयाने लालू प्रसाद यादव यांना १३९ कोटी ३५ लाख रुपयांचा भ्रष्टाचार केल्याप्रकरणी पाच वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली

सिद्धांत
२१ फेब्रुवारी, मुंबई: बिहारचे माजी मुख्यमंत्री लालउपरासाद यादव यांना स्पेशल सीबीआय कोर्टाने चार घोटाळ्याच्या पाचव्या प्रकरणात दोषी असल्याचा निर्णय दिला आहे. या प्रकरणात त्यांना कोर्टाने ५ वर्षाचा तुरुंगवास आणि ६० लाखांचा दंड जाहीर केला.
लालू प्रसाद यादव बिहारचे मुख्यमंत्री असताना तब्बल ९५० कोटींचा चारा घोटाळा झाला असल्याचे उघड झाले होते. या घोटाळ्यात ९९ व्यक्तींचा सहभाग होता. ह्या घोटाळ्यामध्ये चार प्रकरणांचा निकाल याआधीच लागलेला असून शेवटच्या प्रकरणाचा निकाल आज जाहीर करण्यात आला. रांचीच्या न्यायालयाने लालू प्रसाद यादव यांना १३९ कोटी ३५ लाख रुपयांचा भ्रष्टाचार केल्याप्रकरणी पाच वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. तसेच ६० लाखांचा दंड ठोठावला.
शिक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री असलेल्या लालूंप्रसाद यादव यांच्या ऑफिशिअल ट्विटर अकाऊंटवरून कवितेच्या रूपात प्रतिक्रिया मांडण्यात आली.
अन्याय असमानता से
तानाशाही ज़ुल्मी सत्ता से
लड़ा हूँ लड़ता रहूँगा
डाल कर आँखों में आँखें
सच जिसकी ताक़त है
साथ है जिसके जनता
उसके हौसले क्या तोड़ेंगी सलाख़ें
https://www.instagram.com/p/CaPJh8cOZyr/
मैं उनसे लड़ता हूँ जो लोगों को आपस में लड़ाते है
वो हरा नहीं सकते इसलिए साजिशों से फँसाते है
ना डरा ना झुका, सदा लड़ा हूँ, लड़ता ही रहूँगा
लड़ाकों का संघर्ष कायरों को ना समझ आया है ना आएगा।