गडचिरोली पॅरामेडीकल कॉलेज ने केली विद्यार्थ्यांची आर्थिक लूट, विद्यार्थाची मूळकागदपत्र व प्रवेश केलेली फी परतीची मागणी.

55

गडचिरोली पॅरामेडीकल कॉलेज ने केली विद्यार्थ्यांची आर्थिक लूट,
विद्यार्थाची मूळकागदपत्र व प्रवेश केलेली फी परतीची मागणी.

गडचिरोली पॅरामेडीकल कॉलेज ने केली विद्यार्थ्यांची आर्थिक लूट, विद्यार्थाची मूळकागदपत्र व प्रवेश केलेली फी परतीची मागणी.

✍विनोद कोडापे✍
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
📱8380802959📱

गडचिरोली, २०१९ मध्ये डॉ,अनिल कुर्वे रा, भंडारा यांनी गडचिरोली येथे
पॅरामेडीकल या नावाने महाविद्यालय थाटले होते ,सदर कॉलेज बद्दल मोठया प्रमाणात जाहिरात प्रसिद्ध करून अधिकाधिक प्रवेश मिळावे याकरिता खोट्या जाहिराती पोम्प्लेट वाटून शेकडो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक जीवनाशी खेळ करण्याचा प्रयत्न करून फसवणूक केलेली आहे,
सदर पॅरामेडीक कॉलेजला DMLT कोर्सला महाराष्ट्र शासनाच्या कुठल्याही तांत्रिक कोर्स म्हणून मान्यता घेण्यात आली नसताना विकास कौशल व्यवसायिक अभ्यासक्रमात प्रवेश देऊन विद्यार्थ्यांची फसवणूक केली आहे मागील २ महिन्यांपासून झालेल्या फसवणुकीबद्दल विद्यार्थांनी विचारणा केली असता उडवा उडवीचे उत्तर देऊन केवळ भूलथापा देण्याचा प्रयत्न केला जात होता.
अखेर २२ विद्यार्थ्यानी २७ जानेवारी २०२२ रोजी पोलीस स्टेशन गडचिरोली येथे तक्रार दाखल केली,या तक्रारी अगोदर डॉ,अनिल कुर्वे यांनी ७ ते ८ विद्यार्थ्यांना घेतलेले पैसे व मूळ कागदपत्रे परत देऊन पोलीस कार्यवाही पासून वाचण्याचा प्रयत्न केला आहे.
पैसे परत होत असल्याचे पाहून इतर विद्यार्थांनी सुद्धा आमची फसवणुक झाली आमचे पण पैसे परत करण्यात यावे अशी मागणी केली असता डॉ. अनिल कुर्वे यांनी विद्यार्थ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न चालविला आहे. सदर झालेल्या फसवणुकीमुळे विद्यार्थ्याचे पुढील भविष्य धोक्यात आलेले आहे त्यांचे मूळ कागदपत्रे व खोट्या पावत्या देऊन जमा केलेले पैसे डॉ,अनिल कुर्वे हडप करण्याचा प्रयत्न आहे .
संबंधित कॉलेज ची चौकशी करावी व सर्व विद्यार्थ्यांची भरलेली शुल्क परत करण्यात यावी यासाठी विद्यार्थ्यांना अखेर पत्रकार परिषद घ्यावी लागली.
कु. योगिता करोडकर ,कु. गायत्री ठवरे,कु. पल्लवी इंगळे,
कु.उजरा पठाण,कु.अमिषा गोहणे,सुभाष कुडे,सचिन समर्थ सिमनांन शेख,इतर पीडित विद्यार्थी हजर होते.
महाराष्ट्र न्युज ने डॉ,अनिल कुर्वे यांना फोन करून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता डॉ अनिल कुर्वे हे कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर होते.