रियाज कुरेशी मित्रपरिवारतर्फे रेहान बिर्याणी सेंटर गोंडपिपरी येथे शिवजयंती उत्साहात साजरी
राजेंद्र झाडे
गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177
गोंडपिपरी :- हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांची १९ फरवरी ला राज्यात मोठ्या हर्षाने जयंती साजरी केली जाते.जणू शिव प्रेमींना हा एक सणच असतो.मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे १९ फेब्रुवारीला महाराष्ट्रभर साजरा केला जातो.
अश्यातच शिवसेना शहर उपप्रमुख रियाज कुरेशी मित्रपरिवार तर्फे त्यांच्या स्वामालकीच्या रेहान बिर्याणी सेंटर गोंडपीपरी येथे मोठ्या थाटात शिवजयंती साजरी करण्यात आली.महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली.
यावेळी शिवभक्तांनी महाराजाना अभिवादन केले.
महाराजांचा जयजयकार करण्यात आला.प्रसंगी उपस्थितांना बुंदी आणि
मसाला भात वितरित करण्यात आले.यावेळी श्री रियाज कुरेशी , श्री सुनिल संकुलवार, नगरसेवक नगरपंचायत गोंडपीपरी,शिवसेनेचे जेष्ठ नेते संजय माडुरवार,शिवसेना तालुका प्रमुख सुरज माडुरवार,तरुण उमरे,शिवसैनिक बालू झाडे, रमेश नायडू,नितिन धानोरकर,बळवंत भोयर,नाना मडावी,वैभव निमगडे,विवेक राणा,श्री प्रमोद तुंमडे,बब्बू पठाण यांच्यासह शिवप्रेमींची मोठ्या संख्येनी उपस्थित होते.