निराधार योजना व विविध अर्थसहाय्य योजनेचा लाभ तत्काळ देण्यात यावा गोरगरीब लाभार्थी यांची हेळसांड खपवून घेणार नाही – आ.होळी

56

निराधार योजना व विविध अर्थसहाय्य योजनेचा लाभ तत्काळ देण्यात यावा
गोरगरीब लाभार्थी यांची हेळसांड खपवून घेणार नाही – आ.होळी

निराधार योजना व विविध अर्थसहाय्य योजनेचा लाभ तत्काळ देण्यात यावा गोरगरीब लाभार्थी यांची हेळसांड खपवून घेणार नाही - आ.होळी

✍विनोद कोडापे✍
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
📱8380802959📱

गडचिरोली, दि.२२ : येथील तहसील कार्यालयात गडचिरोली आ.डॉ.देवराव होळी यांचे अध्यक्षतेखाली तहसीलदार नागटिळक नायब तहसीलदार यांच्या उपस्थितीत तालुक्यात असलेल्या समस्त बँक व्यवस्थापकांची महत्वाची बैठक संपन्न झाली. यावेळी प्रामुख्याने तालुक्यातील श्रावण बाळ योजना निराधार योजना, दीव्यांग अर्थसहाय्य योजना चे तहसील कार्यालय येथून वाटप करण्यात येणारे पैसे लाभार्थी यांचे खात्यात जमा होण्यासाठी एक दोन महिन्यांचा विलंब होत होता. त्यामुळे सर्वसाधारण गोरगरीब, निराधार व अबाल व वयोवृध्द माता, पीता यांना वारंवार बँकेत येऊन, खाते तपासणी करावी लागत होती व अनेक गोरगरीब तालुक्यातून, तिकिटाचे पैसे नसल्याने पायपीट करून तालुक्यात येतात व विनाकारण वेळ आणि पैसा गेल्या कित्येक वर्षांपासून वाया जात होती. परंतु आजच्या बैठकीत आ.होळी यांचे पुढाकाराने करण्यात आलेल्या नियोजन अनुसार लाभार्थी यांचे पैसे बँक निहाय जमा करण्यात येणार आहे व लाभार्थी यांच्या खात्यात पैसे जमा करण्यास विलंब लागणार नाही. बँकेस सुद्धा काम करण्यास सोपा पर्याय मिळाला. यावेळी प्रामुख्याने उपस्थित सर्व बँकेच्या व्यवस्थापकांना आ.होळी यांनी मार्गदर्शन केले व तालुक्यातील तमाम श्रावण बाळ योजना, निराधार योजना, शिष्यवृत्ती योजना, दिव्यांग अर्थसहाय्य योजनेचा लाभ तत्काळ देण्यात यावा व बँकेत आलेल्या लाभार्थी यांची हेळसांड खपवून घेणार नाही असे प्रतिपादन आ.डॉ होळी यांनी केले.
यावेळी तालुक्यातील बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंडिया, को, ऑपरेटिव्ह बँक, विदर्भ कोकण बँक व विविध बँकेचे व्यवस्थापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.