मनरेगा अंतर्गत रस्त्यांचे खडीकरण व घरकुल चे अपूर्ण मस्टर व सर्व प्रलंबित कामे मार्च आधी पूर्ण करा!आमदार डॉ देवराव होळी

50

✍विनोद कोडापे✍
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
📱8380803959📱

चामोर्षी – 22 फेब्रुवारी 2022
तालुक्यातील पंचायत समिती येथे
आज गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ देवराव होळी यांनी नरेगा अंतर्गत
कामांचा आढावा घेतला यावेळी
संवर्ग विकास अधिकारी
मूरुगनंदम , सभापती डोरलिगर साहेब , विकास अधिकारी डुकरे , विस्तार अधिकारी काळबांधे , ए,पि,ओ, नरेगा मेश्राम साहेब , उपस्थित होते , उपस्थितांना आमदार डॉ देवराव होळी यांनी मार्गदर्शन केले
आजच्या आढावा बैठकीत आमदार डॉ होळी यांनी नरेगा कामांचा आढावा घेतला व पांदन
रस्त्यांचे नवीन नियमानुसार खडीकरण करण्यात यावे व आवश्यक तेथे मातीकाम सुरू करण्यात यावे आता पर्यंत 150 पैकी 130 ग्रामपंचायतने स्वामित्वचे काम पूर्ण केले आहे
व गावनिहाय ड्रोन सर्व्हे करतांना
ग्रामपंचायत कमेटी व ग्राम सचिव यांनी प्रामुख्याने उपस्थित राहून ड्रोण सर्व्हे करून घ्यावे असे आव्हान केले व मार्च महिन्ापर्यंत समस्त नरेगा अंतर्गत विविध प्रलंबित कामे पूर्ण
करण्याचे निर्देश आमदार डॉ देवराव होळी यांनी दिले
आढावा बैठक यशस्वी करण्यासाठी पंचायत समितीच्या
सामान्य प्रशासन विभागाचे वरिष्ठ
अधिकारी , कर्मचारी यांनी
अथक प्रयत्न केले यावेळी प्रामुख्याने गडचिरोली जिल्ह्यातील नरेगाचे वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते,