दुर्मिळ ‘ब्लॅक स्टार्क'(काळा करकोचा) भंडारा जिल्ह्यात प्रथमच आढळला दुर्मिळ पट्टकादंब बदकांचे (बार हेडेड गीज) सुद्धा 5 वर्षानंतर भंडारा जिल्ह्यात आगमन

61

दुर्मिळ ‘ब्लॅक स्टार्क'(काळा करकोचा) भंडारा जिल्ह्यात प्रथमच आढळला

दुर्मिळ पट्टकादंब बदकांचे (बार हेडेड गीज) सुद्धा 5 वर्षानंतर भंडारा जिल्ह्यात आगमन

दुर्मिळ 'ब्लॅक स्टार्क'(काळा करकोचा) भंडारा जिल्ह्यात प्रथमच आढळला दुर्मिळ पट्टकादंब बदकांचे (बार हेडेड गीज) सुद्धा 5 वर्षानंतर भंडारा जिल्ह्यात आगमन

✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
📱7620512045📱

लाखनी:- ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब तर्फे भंडारा- गोंदिया जिल्ह्यात मागील 20 वर्षांपासून स्थलांतरित पाणपक्ष्यांची गणना करीत असुन याच पक्षीनिरीक्षणातून दुर्मिळ ब्लॅक स्टार्क (‘काळा करकोचा)’ भंडारा -गोंदिया जिल्ह्यात प्रथमच मागील वीस वर्षाच्या स्थलांतरित पक्षी निरीक्षणात आढळला आहे.ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबचे कार्यवाह प्रा.अशोक गायधने यांनी अधिक माहिती देताना सांगितले की
या दुर्मिळ ‘काळा करकोचा (‘ब्लॅक स्टोर्क’) पक्ष्याचे मूळ वसतिस्थान मध्य युरोप मध्ये आहे त्यांची लांब चोच व लांब पाय लाल रंगाचे तर पोटाचा काही पांढरा रंग वगळता इतर शरीर संपूर्ण काळ्या रंगाचे असते.याचे शास्त्रीय नाव ‘सिनकोना नायग्रा’असून त्याची सरासरी लांबी 100 सें मी. असते.युरोपमधील कडक थंडीपासून बचाव करण्याकरिता इतर स्थलांतरित बदकांसोबत हे चार काळे करकोचे त्यामध्ये दोन प्रौढ नर मादी तर दोन काळे करकोचे अप्रौढ अवस्थेतील आहेत.हे चार दुर्मिळ काळे करकोचे लाखनी तालुक्यातील एका तलावात फरवरी महिन्यात अवतरले आहेत.यापूर्वी भंडारा जिल्ह्यात 5 वर्षांपूर्वी दुर्मिळ व्हाइट स्टार्क(पांढरा करकोचा)युरोपमधून 3 च्या संख्येने आले होते. आता काळा करकोचा विदर्भातील काही जिल्ह्यात यापूर्वी आढळला असला तरी भंडारा- गोंदिया जिल्ह्यात प्रथमच दर्शन घडले असून यामुळे जिल्ह्याच्या पक्षीवैभवतेत अजून भर पडली आहे अशी माहिती ग्रीनफ्रेंड्स कार्यवाह प्रा.अशोक गायधने यांनी यावेळी दिली. सोबतच भंडारा जिल्ह्यातील दोन तलावामध्ये 5 वर्षांनंतर पट्टकादंब अथवा राजहंस बदके (बार हेडेड गुज)24 च्या संख्येने अवतरले असून पक्षीप्रेमीमध्ये आनंदाची लहर पसरली आहे.मध्य आशिया,मंगोलिया, तिबेट,लडाख भागातील हे बदके डोक्यावर असलेल्या दोन काळ्या रेषा पांढऱ्या रंगावर उठून दिसत असल्याने त्यांना पट्टकादंब म्हणून ओळखले जाते. भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कलहंस बदक ( ग्रेलॅग गुज)येत असतात.यासोबतच मोठी लालसरी, साधी लालसरी,चक्रवाक,शेंडी बदक,नकटा बदक,गढवाल, गारगेनी,अटला बदक,विजन बदक,सुंदर बटवा,थापट्या इत्यादी बदक युरोप आशियातून दरवर्षी भंडारा गोंदिया जिल्ह्यातील विविध तलावावर येत असतात .यात ब्लॅक स्टार्क अथवा काळा करकोचा या यादित वाढल्याने तसेच पाच वर्षानंतर दुर्मिळ पट्टकादंब बदक अथवा राजहंस बदक 24 च्या संख्येने भंडारा जिल्ह्यात आल्याने पक्षीप्रेमीमध्ये आनंदाची लहर पसरली आहे.

https://www.instagram.com/p/CaR3l4hFJyB/

 

भंडारा गोंदिया जिल्ह्यात भात शेती भरपूर प्रमाणात असल्याने कलहंस बदक खूप प्रमाणात येतात त्यामानाने पट्टकादंब किंवा राजहंस भंडारा गोंदिया जिल्ह्यात तुरळक प्रमाणात येतात .यावर्षी पट्टकादंब तसेच दुर्मिळ काळा करकोचाचे दर्शन इतर स्थलांतरित बदकांसोबत फेब्रुवारी महिन्यात घडल्याने जिल्ह्यातील पक्षीप्रेमी सुखावले आहेत.त्यांना तलावामध्ये पक्षीथांबे व नैसर्गिक पक्षीखाद्य जर तलावात मिळाले तर त्यांना अधिक सुरक्षितता लाभून त्यांचे वास्तव्य अधिक काळ वाढू शकेल.प्रा.अशोक गायधने पक्षीअभ्यासक व कार्यवाह ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब लाखनी,जि.भंडारा*