खासदार सुनील मेंढे यांच्या घरा समोर, कांग्रेस कमिटी तर्फे माफ़ी मांगो आंदोलन,

55

खासदार सुनील मेंढे यांच्या घरा समोर, कांग्रेस कमिटी तर्फे माफ़ी मांगो आंदोलन,

खासदार सुनील मेंढे यांच्या घरा समोर, कांग्रेस कमिटी तर्फे माफ़ी मांगो आंदोलन,

✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
📱7620512045📱

लाखणी /भंडारा:-काँग्रेस पक्षाने संपूर्ण देशामध्ये कोरोना पसरवला असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेमध्ये केले, जे अतिशय दुर्भाग्यपूर्ण आहे. ही बाब छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा असलेल्या महाराष्ट्राचा व महाराष्ट्रातील जनतेचा घोर अपमान करणारी आहे. वास्तविक कोरोनाने संपूर्ण जगामध्ये धुमाकूळ घातलेला असतांना ‘नमस्ते ट्रम्प’ हा कार्यक्रम घेवून मोदींनी लाखोंची गर्दी केली आणि त्यामाध्यमातून कोरोना देशात पसरवला. देशात कोरोनाचे संकट कायम असतांनाही बिहार राज्यात विधानसभा निवडणूक घेण्यात आली, परिणामी तेथे कोरोनाचा विस्फोट झाला. पुढील टप्प्यात कोरोनाचा प्रार्दुभाव वाढलेला असतांना देखील काळात पश्चिम बंगाल, आसाम, तामीळनाडू, केरळ आणि पोंडीचेरी या राज्यात विधानसभा निवडणूका घेण्यात आल्या. खऱ्या अर्थाने कोरोना पसरविण्याचे पाप हे मोदी सरकारनेच केले आहे. मात्र उत्तर प्रदेश मधील विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून, स्वतःचे पाप महाराष्ट्रावर लादण्याचा केविलवाणा प्रयत्न नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या वक्तव्यातून केला आहे.
मा. प्रांताध्यक्ष श्री. नानाभाऊ पटोले यांच्या निर्देशावरुन श्री मोहन पंचभाई अध्यक्ष भंडारा जिल्हा कांग्रेस कमिटी यांच्या नेतृत्वात पंतप्रधान नरेंद्र मोदी *माफ़ी मांगो आंदोलन* त्रिमूर्ति चौक ते भंडारा- गोंदिया चे खासदार सुनील मेंढे यांच्या घरासमोर आंदोलन करतांनी पोलिसांनी लावलेले बरीकेट तोडून खासदार सुनील मेंढे यांच्या घरी जातानी अनेक कार्यकर्ता यांना अटक केली व काही वेळानी सुटका करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला अपमानीत करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाच्या नेत्यांनी महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी याकरिता आपल्या जिल्हयातील भाजपाचे खासदार सुनील मेन्ढे यांच्या घरासमोर आज आंदोलन केले. यावेळी श्री मोहन पंचभाई अध्यक्ष भंडारा जिल्हा कांग्रेस कमिटी, प्रदेश महासचिव जिया पटेल, दिलीप जी बेंसोड, प्रदेश सचिव अमर वराडे, वरिस्ट उपाध्यक्ष रत्नदीप दहीवले, जि. प. गट नेता रमेश पारधी, सौ जयश्री बोरकर अध्यक्ष भंडारा जिल्हा महिला कांग्रेस कमिटी,वरिस्ट उपाध्यक्ष सुभाष आजवले, तालुका अध्यक्ष प्यारेलाल वाघमारे, लाखनी तालुका अध्यक्ष राजू भाऊ निर्वाण, राकेश कोडापे जिल्हा अध्यक्ष क्रीड़ा सेल , शिवा भाऊ गायधने, विजय कापसे, सफी भाई लद्दानी, भगवान नवघरे, देवा इलमे, कविता उइके, गंगाधर जिभकाटे, विद्या कुंभरे, नरेन्द्र बिलवने, , शहर अध्यक्ष प्रशांत देशकर, प्रमोद तितिरमारे ,सौ मंजूषा चौहान जिल्हा अध्यक्ष अनु सूचित जाती महिला ,अवैश पटेल जिल्हाअध्यक्ष अल्पसंख्यक, प्रिया खंडारे, काजल चवडे, सीमा रामटेके, शंकर राउत, प्रशांत वाघाये, नितिन धकाते, संजय चौधरी, धनराज साठवने, सुरेश मेश्राम् , बालू ठवकर, तुलसीराम बिलवने, हंशराम गजभीये, चंद्रशेखर कवड़े, कमल साठवने, पवन वंजारी, विनीत देशपांडे, सचिन हिंगे, बिट्टू सुखदेवे, महबूब खान, नवाब खान, पराग सुखदेवे, रोहित धकाते, कृष्णा ठवकर, व असंख्य कार्यकर्ता उपस्थित होते.