भूमिहीन झालेल्या प्रकल्पग्रस्तांना सत्ताधारी पक्ष न्याय देण्यास ठरला असमर्थ – श्री. सुरज ठाकरे
विरोधी पक्षातील नेते आ. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार घेणार सदर मुद्द्यावर “लक्षवेधी”
प्रथम तेलंग चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी मो नंबर 7020016684
चंद्रपूर : – महावितरण कंपनीने सी एस टी पी एस चंद्रपुर च्या पाईप कन्वेअर बेल्टच्या कामासाठी सन २०१८-१९ मध्ये चांदसुर्ला ता. जि. चंद्रपूर येथील परिसरातील शेतकऱ्यांची जमीन संपादित करून सर्वप्रथम शेतकऱ्यांना भूमिहीन करून जमिनीच्या मोबदल्यात सी एस टी पी एस चंद्रपुर या कंपनीमध्ये प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरूपी कामावर सामावून घेण्याचे आश्वासन दिले. नंतर २०२१ मध्ये एकूण १९ प्रकल्पग्रस्त कामगारांपैकी फक्त १० कामगारांनाचं नियमित दोन महिन्याचे काम देऊन नंतर ३० दिवसांपैकी १५ दिवसांचे काम आहे असे सांगून जाणीवपूर्वक कामगारांना रोजगारापासून वंचित ठेवण्याकरिता व त्यांची दिशाभूल करण्याकरिता फक्त कंपनी प्रशासनाने गेट पास बनविले. परंतु या १० कामगारांना अद्याप कंपनीने कामावर सामावून घेतले नाही. व ९ कामगार हे रोजगाराच्या प्रतीक्षेत कंपनीला वारंवार विनंती करून देखील अद्याप बेरोजगारचं आहेत. यासंदर्भात कंपनी प्रशासनासह सत्ताधारी पक्षांना समस्या तोंडी/ लेखीस्वरूपी सांगून सुद्धा समस्त कामगारांना अद्याप न्याय मिळाला नाही. नुकतेच मागच्या आठवड्यामध्ये सत्ताधारी पक्षाचे राज्यमंत्री श्री. प्राजक्त तनपुरे यांना देखील समस्त प्रकल्पग्रस्तांनी निवेदन देत समस्या सांगितल्या खरं पाहता राज्य मंत्र्यांसाठी हे काम खूप कष्टाचे नव्हतेचं कदाचित त्यांनी हस्तक्षेप करता क्षणी समस्त बेरोजगारांना रोजगार मिळाला असता परंतु त्यांच्याकडूनही फक्त आश्वासन व फक्त भुलथापाचं मिळाले न्याय नाही. अखेर प्रकल्पग्रस्त कामगार सत्ताधारी पक्षांकडून निराश होऊन युवा स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री. सुरजभाऊ ठाकरे यांना समस्त प्रकल्पग्रस्तांनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाची माहिती देताचक्षणी श्री. सुरजभाऊ ठाकरे यांनी तात्काळ दिनांक:- १८/०२/२०२२ रोजी संबंधित विभागांमध्ये पत्रव्यवहार करून सदर पत्रामध्ये “ज्याप्रकारे सी एस टी पी एस चंद्रपुर ची शेतकऱ्यांकडून जमिनी घेतांना आग्रहाची/ सौजन्याची भूमिका असते त्याच प्रकारे जमिनीच्या मोबदल्यात भूमिहीन केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांना रोजगार द्यायच्याबाबतीत आग्रहाची व सौजन्याची भूमिका का दिसत नाही??? असा सवाल करत संबंधित विभागामध्ये निवेदन दिले. तथा सत्ताधाऱ्यांच्या विरोधी पक्षातील आमदार श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार (माजी- वित्तमंत्री, वनमंत्री तथा पालकमंत्री चंद्रपुर) यांना समस्यांचे गांभीर्य सांगताच त्यांनी सदर प्रकल्पग्रस्त कामगारांवर होणारा अन्याय दूर करून त्यांना न्याय देण्याकरिता “लक्षवेधी” घेणारचं असे श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी युवा स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री. सूरजभाऊ ठाकरे यांना सांगितले.