नगर परिषद ब्रम्हपुरी अंतर्गत वृक्ष लागवड कंत्राटात लाखोचा घोटाळा..!

75

हितसंबंधातील लोकांमार्फत नगरपरिषदचे लक्तरे तोडण्याचा डाव

न. प. ब्रम्हपुरी अंतर्गत वृक्ष लागवड कंत्राटात लाखोचा घोटा

कृष्णा वैद्य
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
मो. नं: ९५४५४६२५००
२८ फेब्रुवारी

ब्रम्हपुरी :-
नगरपरिषद क्षेत्रात निरनिराळ्या ठिकाणी लोकोपयोगी वृक्ष लावणे व जतन करण्याचे कंत्राट
अंदाजपत्रकीय रक्कम 42,94,004 /- रुपयाच्या कामाचे कार्यादेश आले करारनाम्या नुसार वृक्ष लागवड पासून दोन वर्षे पर्यंत वृक्ष देखभाल व जतन नियंत्रण करिता आवश्यक प्रक्रिया राबवत करून शंभर टक्के वृक्ष जतन करणे बंधनकारक ठरविण्यात आले होते. तर लोकोपयोगी 15 हजार झाडे नगरपरिषद क्षेत्रात लावतांना संबंधित प्रभागाचे नगरसेवक यांना वृक्षलागवड कार्यक्रमात सहभागी करून घेतं फोटोसेशन करत संपूर्ण वृक्ष लागवड बंधनकारक राहील असे कंत्राटदाराशी झालेल्या करारनाम्यानुसार ठरले होते.

४२,९४,००४ रकमेच्या या कंत्राटा मध्ये शहराला निवडक दोन ते चार हजार झाडं लाभले तर त्यातील काहीच निवडक झाडं आज घडीला जिवंत असल्याचे बघायला मिळत आहेत तर त्या कालावधी दरम्यान कुठल्याच प्रभागामध्ये नगरसेवकांच्या उपस्थितीत एवढ्या मोठ्या प्रमाणात झाडे लावले गेल्याचे शहरवासियां तर्फे नाकरण्यात येत आहे व सर्व योजना कागदावर कार्यान्वयित होती असे स्पष्ट दिसून येत आहे.

नगरपरिषद मध्ये कंत्राट निघत असतांना कंत्राटदार म्हणून कागदोपत्री कुणाचेही नाव जरी असेल तरी मात्र हितसंबंधातील व आप्तेष्टचं ज्यात मामा-भाषा, भाऊ, काका-काकू,आजी-माजी,भावी म्हणून स्वप्न पाहणारे तर कर्मचारी सुद्धा या ना त्या मार्गे प्रवेश करून हमखास ठेकेदार बनत संबंधिताच्या “आशीर्वादाने” नगरपरिषद चे भविष्यातील मालगुजार बनण्याचा प्रयत्न करत निकृष्ट कामाने नगरपरिषद च्या माध्यमातून शहराचे लक्तरे तोडत असल्याचे शहरातील नागरिकांकडून बोलल्या जात आहे.

https://www.instagram.com/p/CaMqjSiOlaT/

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील वृत्तांत जाणण्यासाठी मीडियावार्ताला INSTAGRAM वर आताच फॉलो करा.