केंद्र सरकार हे महाविकास आघाडी सरकारच्या विकास कामांना आळा घालण्यासाठी खोटे आरोप करत असल्याची टीका

वतीने आंदोलन
सौ.हनीशा दुधे
बल्लारपूर तालुका प्रतिनधी
२८ फेब्रुवारी
बल्लारपूर: राज्य मंत्रिमंडळाचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना तीन दिवसा आधी पहाटे पाच वाजता च्या सुमारास केंद्रीय संस्था ईडी ने अटक केली.अटकेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना,काँग्रेस पक्ष म्हणजेच महाविकास आघाडी तर्फे आज बल्लारपूर येथे केंद्र सरकार आणि ईडी च्या विरोधात आंदोलन करण्यात आले.आंदोलना चे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बल्लारपूर शहर अध्यक्ष बादल भाऊ उराडे ,कार्याध्यक्ष इंजि. राकेश सोमानी,बल्लारपूर शहर काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेता घनश्याम भैय्या मुलचंदानी,बल्लारपूर शिवसेना नगर परिषद सदस्य सिक्की भैय्या यादव यांनी केले.
केंद्र सरकार हे महाविकास आघाडी सरकारच्या विकास कामांना आळा घालण्यासाठी खोटे आरोप करून व आपल्या सत्तेचा गैरवापर करून ईडी चा वापर करून नवाब मलिक यांना अटक केली आहे.मात्र महाविकास आघाडी व राष्ट्रवादी पक्ष नवाब मलीक यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहो व राहणार असून दिल्लीच्या तख्त पुढे महाराष्ट्र कधी झुकला नाही आणि झुकणार ही नाही असे बल्लारपूर शहर कार्याध्यक्ष इंजि. राकेश सोमानी यांनी व्हिडियो बाईट मध्ये म्हटले.नरेंद्र मोदी,देवेंद्र फडणवीस यांचा आम्ही जाहीर निषेध करतो असेही म्हणत आंदोलकांनी नारेबाजी केली.
हे आपण वाचलंत का?
- छत्रपती संभाजी महाराजांच्या मातोश्री महाराणी सईबाई यांच्या समाधीस्थळाचा होणार जीर्णोद्धार
- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कविता.
या निषेधात उपस्थित बल्लारपूर चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी सूर्या भाऊ अडबाले,कार्याध्यक्ष इंजि. राकेश सोमानी,उपाध्यक्ष आरिफ खान,बल्लारपूर शहर अल्पसंख्याक अध्यक्ष इब्राहिम खान,महिला विधानसभा अध्यक्ष शुभांगी साठे, शहर अध्यक्ष अर्चना बुटले, कार्याध्यक्ष सयजादि अन्सारी, उपाध्यक्ष मलेश्वरी महेशकर,काँग्रेस चे वरिष्ठ नेता ,रजनी हजारे, डॉ. कुलदीपवार, देवेंद्र आर्य, छाया मडावी, भास्कर माकोडे,महिला शहर अध्यक्ष मेघा भाले, अफसाना सय्यद, इस्माईल धाकवाला, तसेच शिवसेनेचे जेष्ठ नेता,सुवर्णा मुरकुटे, प्रभाकर मुरकुटे, प्रकाश पाठक, बाबा शाहू व महाविकास आघाडी चे मोठ्या प्रमाणात पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
https://www.instagram.com/p/CaCcWa7qu0D/
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील वृत्तांत जाणण्यासाठी मीडियावार्ताला INSTAGRAM वर आताच फॉलो करा.