मार्कंडा देवस्थान यात्रा रद्द करण्याच्या शासनाच्या निर्णयाचा केला तीव्र निषेध. मंजुरी दिली नाही तर भाविक कोणत्याही परिस्थितीत यात्रा भरवतील, आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचा शासनाला इशारा
विनोद कोडापे✍️
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
📱8380803959📱
२७ फेब्रुवारी,गडचिरोली: लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या व विदर्भाची काशी म्हणून गौरवान्वित असलेल्या मार्कंडा देवस्थान व चपराळा येथील महाशिवरात्रीनिमित्त भरणारी यात्रा रद्द करण्याचा शासनाचा निर्णय अत्यंत दुर्दैवी असून भाविकांच्या वतीने या निर्णयाचा तीव्र निषेध करण्यात येत आहे. या निर्णयाच्या विरोधात मार्कंडा देवस्थानाच्या प्रवेशद्वारावर आपण उद्या दिनांक २८ फेब्रुवारी ला सकाळी ११ वाजता आंदोलन करणार असल्याची घोषणा आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केली असून या आंदोलनात भाविकांनी सहभाग घ्यावा असे आवाहनही त्यांनी या प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
शासनाने यात्रेला मंजुरी जरी दिली नाही तरी यात्रा कोणत्याही परिस्थितीत भाविक भरल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

राज्यातील महाविकास आघाडी सरकार ही सुरवातीपासूनच मंदिरांवरील कार्यक्रमांवर आघात करीत आहे कोरोना नियमांचे पालन करीत यात्रा सुरू करण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिलेली असताना अचानक ती परवानगी रद्द करणे म्हणजे जिल्ह्यातीलच नव्हे विदर्भातील लाखो भाविकांच्या आस्थेचा अपमान करण्याचा हा निर्णय आहे . या निर्णयामुळे जिल्ह्यातील जनता प्रचंड दुखावली असून मागील २ वर्षापासून मार्कंडेश्वराच्या दर्शनासाठी आतुर असलेल्या भाविकांना या वर्षीही दर्शन करून देण्याचा हा निर्णय अत्यंत दुर्दैवी असल्याचे प्रतिपादन आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केले आहे.
हे आपण वाचलंत का?
एकीकडे मोठमोठ्या सभांना ,कार्यक्रमांना परवानगी दिली जात आहे मात्र दुसरीकडे मंदिर व धार्मिक कार्यक्रमांवर निर्बंध लादले जात आहेत. राज्यातील महाविकास आघाडी सरकार ही भ्रष्टाचाराने बरबटलेली सरकार असून आता त्यांची बुद्धी सुद्धा भ्रष्ट झाल्याचे यावरून दिसून येत आहे. शासनाने यात्रेला लवकरात लवकर मंजुरी द्यावी याकरिता मोठे आंदोलन केले जाईल. तसेच याविरोधात अर्थसंकल्पीय अधिवेशनातही आपण सरकारला जाब विचारणार असल्याचे प्रतिपादन आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केले आहे.
मार्कंडा देवस्थान येथे उद्या सकाळी ११ वा. होणाऱ्या आंदोलनाला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
https://www.instagram.com/p/CZwLU3VNLw4/
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील वृत्तांत जाणण्यासाठी मीडियावार्ताला INSTAGRAM वर आताच फॉलो करा.