मजुरीसाठी निघाले मायलेक, पण दुसऱ्याच दिवशी घरी आले दोघांचेही मृतदेह.

भुषण कावळे प्रतिनिधी

यवतमाळ:-  जिल्ह्यातील वणी  शहरालगतच असलेल्या तालुक्‍यातील चिखलगाव येथील मायलेकाने मानकापी नाल्याजवळील शेतशिवारात विष पिऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

संगीता दुर्वास निखाडे वय 45 व मुलगा राहुल दुर्वास निखाडे वय 23, अशी मृतांची नावे आहेत. ते चिखलगाव येथील रहिवासी होते. त्यांच्याकडे शेती कमी असल्याने ते दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरीने जात होते. शनिवारी दोघेही मायलेक शेतात मजुरीसाठी घरून निघालेत. मात्र, घरी परतलेच नाहीत. त्यामुळे घरच्या मंडळींनी त्यांचा शोध सुरू केला असता, रविवारी  चिखलगाव शेतशिवारातील मानकापी नाल्याजवळील शेतात मायलेकाचा मृतदेह आढळून आला. त्यांनी विष घेल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. नेमकी आत्महत्या केली, याचे कारण अद्याप कळू शकले नाही.

भरधाव कार लिंबाच्या झाडावर आदळल्याने झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला. ही घटना शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास येथून जवळच असलेल्या पांढरकवडा-यवतमाळ मार्गावर घडली.

प्रशांत मंडजवार वय 45, रा. वाघापूर व नितील लांगर वय 37, रा. वंजारी फैल, यवतमाळ या अपघात मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. या अपघातात चंदन बहादुरे हा जखमी झाला आहे. वरील तिघेही एका कारने पांढरकवडा येथून यवतमाळकडे येत असताना शनिवारी रात्री त्यांची कार लिंबाच्या झाडावर जाऊन आदळली. त्यात दोघांचा मृत्यू झाला. याप्रकरणी यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. याबाबतचा पुढील तपास ठाणेदारांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here