डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भाऊराव गायकवाड यांना ३ मार्च १९३४ साली लिहिलेल्या पत्रामध्ये लिहिले होते?

 

सिद्धांत
मीडिया वार्ता न्युज
२ मार्च, मुंबई: २ मार्च १९३० साली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या समाजाला प्रवेश मिळावा म्ह्णून सत्याग्रहाला सुरुवात केली होती. तत्कालीन सनातनी हिंदूंच्या प्रखर विरोधाला ना जुमानता आंबेडकरी अनुयायांनी पुढची तब्बल पाच वर्षे हा सत्याग्रह चालू ठेवला.

खरंतर काळाराम मंदिरात प्रवेश मिळाल्यानंतर अस्पृश्यांचे सारे प्रश्न सुटतील, असे मला अजिबात वाटत नाही, हे बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रहाच्या पहिल्याच दिवशी केलेल्या भाषणात जाहीर केले होते. मग सत्याग्रह करण्यामागचे मुख्य कारण काय होते? याबाबत बाबासाहेबांनी भाऊराव गायकवाड ३ मार्च १९३४ साली लिहिलेल्या पत्रामध्ये खुलासा केला होता.

गायकवाडांना लिहिलेल्या पत्रात बाबासाहेब म्हणतात कि, मी काळाराम मंदिर सत्याग्रहाची सुरुवात अस्पृश्य समाजाला ज्या देवतांचे दर्शन घेण्यासदेखील मनाई आहे, अश्या देवतांची पूजा-अर्चा करायला मिळावी म्हणून केली नव्हती. मंदिरात प्रवेश मिळाल्यानंतर सनातनी हिंदू समाजामध्ये अस्पृश्य समाजाला मानाचे स्थान मिळेल असेही मला वाटत नाही. मी हा सत्याग्रह सनातनी हिंदूच्या लेखी, त्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या समाजव्यवस्थेमध्ये अस्पृश्य समाजातील लोकांचे स्थान किती खालच्या पातळीवरचे आहे, उच्चवर्णीय हिंदूंकडून पिढ्यानपिढ्या त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाची त्यांना जाणीव करून देण्यासाठी केला होता.

(सत्याग्रहाच्या पाच वर्षानंतर) मला वाटते त्यांना अन्यायाची जाणीव करून देण्यात मला यश आले आहे. मला वाटते कि, अस्पृश्य समाजाने मंदिर प्रवेशाचा लढा आता सोडून देऊन आता  शिक्षण आणि राजकारणामध्ये प्रगती करण्यासाठी करावी. मला आशा आहे कि अस्पृश्य समाजाला ह्या दोन्ही गोष्टींचे महत्त्व कळेल.

 

हे आपण वाचलंत का?

 

सनातनी हिंदूंचे मन अस्पृश्य समाजाला मानव म्हणून स्वीकारण्यास तयार आहे कि नाही याची पडताळणी काळाराम सत्याग्रहाद्वारे हॊणार आहे, असे विधान बाबासाहेब आंबेडकरांनी २ मार्च १९३० रोजी केलेल्या भाषणामध्ये केले होते. सत्याग्रहाच्या दरम्यान अस्पृश्य समाजाला सनात्यांकडून अतोनात त्रास सहन करावा लागला होता. अस्पृश्य मुलांच्या शाळा बंद करण्यात आल्या, अस्पृश्य लोकांच्या रहदारीचे रस्ते बंद करण्यात आले, त्यांना जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीस मनाई करण्यात आली. सत्याग्रहींना मारहाण करण्यात आली. अखेर पुढे देशाच्या संविधानाची निर्मिती करून बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यतेवर कायदेशीररित्या कायमचा घाव घातला.

या संविधानामुळेच अलीकडेच तामिळनाडू मध्ये चिदंबरम नटराजर मंदिरात एका महिलेला प्रवेश करण्यापासून रोखणाऱ्या २० पुजाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पण देशातल्या सर्वच ठिकाणी अश्या सनातनी वृत्तीवर कायद्याचा वचक आहे का? आणि हे पडताळण्याचे काम देशातील संबंधित संस्था करत आहेत का?

अजूनही देशातल्या मंदीरात शुद्रांनी मंदिरात प्रवेश करू नये, असे बोर्ड पाहायला मिळतात. गेल्या वर्षी २० ऑक्टोबर रोजी गुजरातच्या कच्छमध्ये मंदीरात प्रवेश केला म्हणून सहा जणांच्या कुटुंबाला जबर मारहाण करण्यात आली. त्यांच्या शेतीची नासधूस करण्यात आली. २०२० ला ३१ मे रोजी उत्तर प्रदेशमधील एका १७ वर्षाच्या मुलाची मंदिरात प्रवेश केल्याने चार जणांनी गोळ्या घालून हत्या केली होती. अशा घटना अधूनमधून टीव्हीवर, वर्तमानपत्रांमधून, सोशल मीडियावर झळकत असतातच.असंख्य घटना तर तिथपर्यंत पोहचत देखील नाही.

सध्याच्या काळातही मंदिरप्रवेश संबंधित हिंसेची प्रकरणे पाहता बाबासाहेबांनी १९३० साली काळाराम सत्याग्रहाच्या दिवशी समाजातील सनातनी वृतींबाबतचे केलेले विधान आजही तितकेच लागू पडते. पडताळणी आपल्या डोळ्यादेखत आजही चालू आहे. त्यातून पुरेशी उत्तरही मिळत आहेत. पण ती स्वीकारण्यास मागासलेल्या जाती जमातीमधील लोक स्वीकारण्यास तयार आहेत का? हा मोठा वाद आहे.

https://www.instagram.com/p/CaEjp4juR7I/

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घडणाऱ्या घटनांचा वृत्तांत जाणण्यासाठी मीडियावार्ताला INSTAGRAM वर फॉलो करा.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here