रशिया युक्रेन युद्धामुळे हजारो भारतीयांच्या मनात भीतीचे काहुर केरळ येथील एक विद्यार्थी मृत्युमुखी

रशिया युक्रेन युद्धामुळे हजारो भारतीयांच्या मनात भीतीचे काहुर

केरळ येथील एक विद्यार्थी मृत्युमुखी

रशिया युक्रेन युद्धामुळे हजारो भारतीयांच्या मनात भीतीचे काहुर केरळ येथील एक विद्यार्थी मृत्युमुखी

त्रिशा राऊत
चिमूर तालुका प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर
Mo 9096817953

चंद्रपूर : मिनिटामिनिटाला धुमसत असलेल्या रशिया युक्रेन युद्धामुळे हजारो भारतीयांच्या मनात भीतीचे काहुर उमटत असुन ह्या युद्धात झालेल्या गोळीबारात केरळ येथील एक विद्यार्थी मृत्युमुखी पडल्यामुळे वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनमध्ये गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचे जीव टांगणीला लागले असुन पालकांची दैन्यावस्था बघायला मिळत आहे.
भारत सरकार प्रयत्नाची पराकाष्ठा करून युद्धजन्य स्थितीत अडकलेल्या भारतीयांना सुखरूप परत आण्यासाठी उपाययोजना करत असुन आतापर्यंत तीन हजारावर भारतीयांना परत आणण्यात यश आले आहे तर देशातील जवळ्पास 4 केंद्रीय मंत्री युक्रेन शेजारील राष्ट्रांत तळ मांडून बसले आहेत.अशातच चंद्रपूरकरांसाठी आनंदाची बातमी मिळाली असुन युक्रेन येथे अडकलेले 12 पैकी 10 विद्यार्थी सुखरूप मायदेशी पोहचले असुन त्यापैकी 6 विद्यार्थी घरी पोहचले आहेत तर 4 विद्यार्थी दिल्ली येथे पोहचले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील 12 विद्यार्थी युक्रेन मधे वैद्यकीय शिक्षण घेत आहेत हे विशेष. स्वगृही परतेल्या 10 विद्यार्थ्यांमध्ये

1. अदिती अनंत सायरे (वरोरा)
2. हर्षल बळवंत ठावरे (चिमुर)
3. ऐश्वर्या प्रफुल्ल खोब्रागडे (चिमुर)
4. धीरज अशिम बिश्र्वास (चंद्रपूर)
5. महेश भोयर (चंद्रपूर)
6. महक उईके (ब्रम्हपुरी)
7. साहिल संतोष भोयर (बल्लारपूर)
8. खुशाल बिपुल विश्वास (चंद्रपूर)
9. शेख अलीशा करीम (राजुरा)
10. गुंजन प्रदिप लोणकर (चिमुर)
ह्याचा समावेश आहे. स्वगृही परतल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडुन वाहत असला तरीही आपल्या अडकलेल्या इतर मित्रांची काळजीसुद्धा त्यांना लागली आहे.
काय म्हणाला हर्षल ठवरे
युक्रेन – रशियाच्या संघर्षानंतर अनेक अडचणींना तोंड देत बुधवारी (दि. २) सकाळी मूळगावी सुखरूप पोहोचलो. याचा अतिशय आनंद होत आहे. मात्र, माझे रूममेट तेथेच अडकल्याचे दुःखही आहे, अशी भावना हर्षल ठवरे या विद्यार्थ्याने व्यक्त केली.
एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षासाठी हर्षल टर्नोफिल शहरात होता. त्याने आधीच १० मार्चला मूळगावी परतण्याची तयारी केली होती, विमानाचे तिकीटपण काढले. मात्र, २४ फेब्रुवारीला कीव्ह शहरावर रशियाने हल्ला केल्याचा संदेश आला. रात्री खिडकी, दरवाजे बंद करून बेसमेंटमध्ये राहण्याच्या सूचना मिळाल्या. २५ फेब्रुवारीला बॅग भरून पोलंडला नेऊ असे सांगितले, पण विद्यार्थी जास्त असल्याने २६ तारखेला रोमोनिया देशाच्या बॉर्डरवर नेण्यात आले. यासाठी चार तास रांगेत अन्न, पाण्याविना राहावे लागले. रात्री १२.३० वाजता बॉर्डर पार करून रोमाेनियात गेलो. सीमेपार भारतीय दूतावासाने व्यवस्था केली आणि २७ फेब्रुवारीला दिल्लीत पोहोचल्याचे हर्षलने सांगितले.

मनाचा थरकाप उडत होता – अदिती सायरे
कुठेही बॉम्बस्फोट होत होते. मनात भीती निर्माण झाली. आता भारतात परत कसे जायचे, या चिंतेने मनाचा थरकाप उडत होता. एकामागून एक होणाऱ्या बॉम्बस्फोटाचे आवाज अजूनही कानात गुंजत आहेत, अशी आपबिती युक्रेनवरून परतलेल्या वरोरा येथील आदिती सायरे हिने सांगितली. आदिती अनंत सायरे ही युक्रेनमध्ये एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षाला आहे. खारकीव्हमध्ये रशियन सैन्याने बॉम्ब टाकल्याची वार्ता कानावर पडली आणि भीती वाटायला लागली. त्याच रात्री एवनोचे विमानतळ रशियन सैन्याने बेचिराख केले. त्यामुळे आता बाहेर कसे पडावे, याची काळजी वाटायला लागली. भारतीय दूतावासाच्या सांगण्यावरून रोमानियात पोहोचलो. तेथील नागरिकांनी आमची केलेली व्यवस्था व मदत ही शब्दात सांगू शकत नाही, असेही ती म्हणाली.