रस्ता बांधकामात दिरंगाईमुळे गांधी नगरवासीय संतप्त

रस्ता बांधकामात दिरंगाईमुळे गांधी नगरवासीय संतप्त

रस्ता बांधकामात दिरंगाईमुळे गांधी नगरवासीय संतप्त

✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
📱7620512045📱

लाखणी/तुमसर :शहर नगर परिषदेच्या प्रभाग क्र. ८ च्या गांधी नगरवासीय नागरिक संतप्त होत नगरपरिषदेचे उपमुख्याधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करून आक्रोश व्यक्त केला. शहरात मागील २२ दिवसापासून बुद्ध विहार ते नागमंदिर पर्यंतच्या संपूर्ण डांबरी रस्ता कंत्राटदारानी खोदकाम करून ठेवल्याने परिसरातील नागरिकांनी नगरपरिषदेचे संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला. एकूणच नागरिकांना वेठीस धरल्याचे दिसून येते. यावेळी शिवसेना पदाधिकारी तुमसर नगरपरिषदेचे शहर अभियंता मृणाल हुमने यांच्या कक्षात गेले असता गैरहजर होते. दरम्यान भ्रमणध्वनीवर शहर अभियंताशी संपर्क साधला असता कंत्राटदार चेतन मेश्राम यांना रस्ता बांधकाम सुरू करण्याचे निर्देश दिले आहे. परंतु ते अद्यापही ऐकत नसल्याचे सांगितले. याप्रकरणी नगरपरिषदेचे जिल्हा प्रशासन अधिकारी व मुख्याधिकाऱ्यांना रस्ता बांधकामात दिरंगाईमुळे सदर ठिकाणी दैनंदिन अपघातात घडत असल्याची माहिती दिली. यावेळी शिवसेनेचे विभाग प्रमुख अमित एच. मेश्राम, दीपक मलेवार, स्वप्नील बडवाईक, शुभम कारेमोरे, सुधाकर मलेवार, उमाकांत बडवाईक, सुनील थोटे, प्रशांत गोखले, संजय बडवाईक उपस्थित होते.