अंबुजा सिमेंट फाउंडेशन उपपरवाही उत्तम कापूस प्रकल्प जागतिक विशेष कार्यक्रम नांदगाव (सूर्या) इथे संपन्न

अंबुजा सिमेंट फाउंडेशन उपपरवाही उत्तम कापूस प्रकल्प जागतिक विशेष कार्यक्रम नांदगाव (सूर्या) इथे संपन्न

अंबुजा सिमेंट फाउंडेशन उपपरवाही उत्तम कापूस प्रकल्प जागतिक विशेष कार्यक्रम नांदगाव (सूर्या) इथे संपन्न

*प्रथम तेलंग चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी मो नंबर 7020016684*

चंद्रपूर : – आज दिनांक 4/3/2022 रोजी अंबुजा सिमेंट फाउंडेशन उप्परवाही , उत्तम कापुस प्रकल्प, एकता महिला संघ, साफल्य प्रोड्युसर कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद शाळा नांदगाव सुर्या येथे जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी डान्स, रांगोळी स्पर्धा, मेणबत्ती स्पर्धा घेण्यात आले. आरोग्य , महिला व्यवसाय, शेती बद्दल ची माहिती, समान काम समान वेतन , स्त्री पुरुष समानता , डिसपोझ पेस्टीं साईड कंटेनेर , क्रॉप रोटेश , सॉइल फर्टिलिटी, कापसाच्या तंतूची काळजी घेणे इत्यादी विषयावर सुचिता खडसे यांनी मार्गदर्शन केले , तसेच बीपी शुगरचा कॅम्प घेण्यात आला . गावकऱ्यांनी या कॅम्प चा लाभ घेतला. गावकऱ्यांनी घेतला . या वेळी कार्यक्रमला गावातील सरपंच विजयभाऊ निखाडे, ग्रामसेवक राठोड सर, PHC कवठाळा च्या डॉ. तडवी , CHO श्वेता देवगडे, निंबाळकर PHC, आशा वर्कर सीमाताई चौधरी, रजनी बावणे, अंगणवाडी सेविका योगिता कवठे, मंदा लांजेकर, ग्रामसंघाचे अध्यक्ष प्रतिभा घोटकर, सदस्य लता भोयर, वंदना गुप्ता, निर्मला चौधरी,
पशु सखी कविता पडाळ, एकोडी येथील अंगणवाडी सेविका निशा मिलमिले, आशा वर्कर अलका दळजे, CRP मायाताई चौधरी तसेच अंबुजा सिमेंट फाउंडेशन मध्ये महिला सक्षमीकरण चे प्रोजेक्ट कॉर्डिनेटर ज्योतिताई खंडारे , प्रोजेक्ट मॅनेजर श्रीकांत कुंभारे, अश्विनी विषवोज्ज्वर , ताई खेडवतकर, सीमा धूर्तकर, मनिषा कष्टी, रुपाली कष्टी, कल्पना मडावी, उत्तम कापुस प्रकल्प मधुन सुचिता खडसे उपस्थितीत होते. गावकऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.