उप पोस्टे देचलीपेठाच्या वतीने करण्यात आले होते भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धाचे आयोजन

उप पोस्टे देचलीपेठाच्या वतीने करण्यात आले होते भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धाचे आयोजन

उप पोस्टे देचलीपेठाच्या वतीने करण्यात आले होते भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धाचे आयोजन

✒धनराज आर. वैरागडे ✒
9421527972
गडचिरोली उपजिल्हा प्रतिनिधी

दि.19/02/2022 ते दि. 02/03/2022 या कालावधीत उप पोस्टे देचलीपेठाच्या वतीने पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन शहीद पोउपनि शशांक मलकापुरे यांचे स्मरणार्थ भव्य क्रिकेट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा चे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धे दरम्यान पोलिस ठाणे हद्दीतील 22 टीम ने क्रिकेट स्पर्धेत सहभाग नोंदविला.
तसेच झालेल्या स्पर्धा मध्ये हद्दीतील तरुण मुलांना उपपोस्टे च्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनेची माहिती देण्यात आली तसेच आगामी पोलीस भरती विषयी मार्गदर्शन करण्यात आले. सदर स्पर्धेचा दिनांक 03/03/2022 रोजी अंतिम सामना घेऊन स्पर्धापार पडली.
स्पर्धेच्या समारोप कार्यक्रम दरम्यान हद्दीतील विजेत्या संघांना योग्य रोख पारितोषिक व चषक देण्यात आले तसेच सीआरपीएफ 9 बटालियन यांच्या तर्फे हद्दीतील क्रिकेट खेळाडू साठी क्रिकेट चे पूर्ण साहित्य वाटप करण्यात आले.
तसेच हद्दीतील तरुण वर्ग हा कोणत्याही प्रकारच्या वाईट प्रलोभनांना बळी न पडता जास्तीत जास्त खेळाकडे कसा आकर्षीत होईल यासाठी सर्व खेळाडू ना खेळाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.
पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन वरीष्ठ अधिकारी यांचे संकल्पनेतुन तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुजितकुमार क्षीरसागर सा, यांचे मार्गदर्शनाखाली उपपोस्टे चे प्रभारी अधिकारी श्री सुधीर साठे, पोउनि गोविंद खटींग, पोउनि भारत वर्मा पोउनि अभय माकणे व उप पोस्टेमधील सर्व अंमलदार तसेच एसआरपीएफचे अधिकारी व अंमलदार यांनी सदरची स्पर्धा यशस्वी करण्याकरिता अथक परिश्रम घेवुन सदरची स्पर्धा पार पडली.