ग्रामीण भागातील दुर्बल घटकाच्या सर्वांगीण विकासासाठी गोंडवाना विद्यापीठाची निर्मिती कुलगुरू डॉ. प्रशांत श्री बोकारे. गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली
*अरुण रामुजी भोले*
*नागभिड तालुका प्रतिनिधी*
*9403321731*
नागभिड-गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संलग्नित महात्मा ज्योतिबा फुले मागासवर्गीय मंडळ मिंडाळा द्वारा संचालित महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय मिंडाळा ता नागभीड जि चंद्रपूर द्वारा आयोजित विदर्भ मराठी समाजशास्त्र परिषदेचे बारावे राज्यस्तरीय अधिवेशन दिनांक 2 मार्च 2022 रोज बुधवार ला संपन्न झाले. या अधिवेशनाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम सकाळी 10.30 वाजता महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय मिंडाळा येथे महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडला. या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ प्रशांत श्री बोकारे तर अध्यक्ष म्हणून ऍड अमरजीत खंडाळे सचिव, महात्मा फुले मागासवर्गीय मंडळ मिंडाळा, बीज भाषक डॉ किशोर राऊत समाजशास्त्र विभाग, संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बी एम कराडे, मा डॉ अशोक सालोडकर, प्रा नामदेवराव वरभे, समाजशास्त्र परिषदेचे सचिव प्रा डॉ रवींद्र विखार, डॉ धनराज पाटील समाजशास्त्र विभाग प्रमुख, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली हे विचार मंचावर उपस्थित होते. राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, संस्थेचे शिल्पकार दिवंगत अशोक जी खंडाळे यांच्या प्रतिमेला दीप प्रज्वलन करून पुष्पमाला अर्पण करण्यात आली व गोंडवाना विद्यापीठ गीत तसेच स्वागत गीताने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्याचप्रमाणे पुष्पगुच्छ याने सुद्धा स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ बी एम कराडे यांनी केले. तसेच परिषदेचा शोध निबंधाचे, प्राचार्य डॉ बी एम कराडे व प्रा डॉ रवींद्र विखार यांच्या पुस्तकाचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. डॉ मिथुन राऊत यांना आचार्य पदवी मिळाल्याबद्दल व प्रा सचिन खेडकर हे सेट झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. दि 21 जानेवारी 2010 ला या समाजशास्त्र परिषदेची सुरुवात करण्यात आली आणि आज सतत बारा वर्षे होऊ घातले आहेत.या परिषदेत वेगवेगळ्या विषयांवर मनोगत व्यक्त करताना ग्रामीण भागाच्या प्रश्नांना हात घातला आणि आमची वाटचाल दरवर्षी अशीच सुरू राहील. समाजाला दिशा देण्यासाठी ज्ञान सतत सुरू ठेवण्यासाठी ही समाजशास्त्र परिषद चळवळ राबवित आहे असे प्रास्ताविक समाजशास्त्र परिषदेचे अध्यक्ष तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ कराडे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे उद्घाटकीय मनोगत व्यक्त करताना डॉ प्रशांत बोकारे कुलगुरू गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांनी गोंडवाना विद्यापीठ हे ग्रामीण भागातच आहे व ग्रामीण भागातील दुर्बल घटकांच्या सर्वांगीण विकासासाठीच गोंडवाना विद्यापीठाची निर्मिती झाली आहे असे म्हटले. या ज्ञानाचा रथ अविरत सुरू ठेवत ही समाजशास्त्र परिषद सतत बारा वर्षेच नाही तर याही पुढे जाऊन ती सतत बाराशे वर्ष चालत राहील अशा शुभेच्छा त्यांनी परिषदेला दिल्या. या कार्यक्रमाचे बीज भाषक डॉ किशोर राऊत यांनी विषयाची मांडणी करताना प्रत्येक विद्यार्थी हा आदिवासीबहुल भागातील आहे. त्यांच्या वेगवेगळ्या भावना एका धाग्या खाली एकत्रित करून त्यांची सैद्धांतिक मांडणी तसेच वैचारिक मांडणी करून विषयानुसार विस्तारित रुपाने समजावून दिली. त्यानंतर प्रमुख अतिथी डॉ धनराज पाटील समाजशास्त्र विभाग प्रमुख, गडचिरोली यांनी लोकशाहीचे लोकशाहीकरण करून ते तळागाळापर्यंत पोहोचवावे आणि प्रादेशिक करण्याची संकल्पना समाजात रुजवावी. फुले शाहू आंबेडकर यांच्यामुळे समाजातील दुर्बल घटकांमध्ये नवचैतन्य निर्माण होऊन बुद्धांनी सांगितलेली स्वातंत्र्य समता बंधुता व न्याय ही तत्त्वे दुर्बल घटकांपर्यंत पोहोचवून समाजात बदल घडवावा असे विचार व्यक्त केले. पहिल्या सत्रात असंघटित क्षेत्रातील काम करीन महिला व त्यांच्यावरील अत्याचार या विषयावर डॉ स्निग्धा कांबळे डॉ माया मसराम डॉ वाघ सर यांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष अमरजी खंडाळे संस्था सचिव महात्मा ज्योतिबा फुले मागासवर्गीय मंडळ मिंडाळा यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की या संस्थेचे संस्थापक दिवंगत अशोक रावजी खंडाळे यांनी आपले जन्मगाव म्हणून या लहानशा गावात उच्च शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली व ग्रामीण भागातील दुर्बल घटकांच्या विकासासाठी तसेच त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षणाचा पाया दृढ करण्यात आपले आयुष्य खर्ची घातले. त्यानंतर माझ्याकडे त्यानंतर माझ्याकडे संस्थेची सूत्रे आली. दिवंगत अशोकरावजी खंडाळे यांनी आजीवन केलेल्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचा वसा घेऊन महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या नावाने चालणारे हे वरिष्ठ महाविद्यालय त्यांच्या विचारांना आणि कार यांना पूर्णपणे वाहून घेण्याचा प्रयत्न करीत राहणार.आणि विनाअनुदान तत्त्वावर सुरू असलेल्या ह्या वरिष्ठ महाविद्यालयात बारावे समाजशास्त्रीय परिषदेचे अधिवेशन पार पडत आहे याचा अत्यंत आनंद होत आहे असे म्हटले. परिषदेच्या चर्चासत्रात असंघटित क्षेत्रातील काम करी महिला व त्यांच्यावरील अत्याचार या विषयावर डॉ स्निग्धा कांबळे डॉ माया मसराम डॉ पंढरी वाघ यांनी आपले विचार व्यक्त केले.याप्रसंगी इतर समाजशास्त्रीय अभ्यासकांनी सुद्धा आपले सविस्तर विचार मांडले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ स्निग्धा कांबळे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार डॉ रवींद्र विखार यांनी केले व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या परिषदेसाठी विविध महाविद्यालयांचे प्राध्यापक संशोधक विद्यार्थी उपस्थित होते.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.