शिंदाड आरोग्य उपकेंद्रातील संगीता दुबेले यांना नागरिकांचा सलाम।
ईसा तडवी
मिडिया वार्ता न्युज
पाचोरा तालुका प्रतिनिधी
मो.9860884602
पाचोरा : -शिंदाड येथील आरोग्य उपकेंद्रामध्ये कार्यरत असलेल्या संगीता दुबेले यांचे कर्तव्य वैद्यकीय क्षेत्रातील उच्चशिक्षित असलेल्यांना मोठी चपराकच म्हणावी लागेल.
आज आपण पाहतो अनेक ठिकाणी स्त्री रोग तज्ञ गर्भवती महिलांना शिजरिंग करण्याचा सल्ला देतात. कदाचित नैसर्गिक डिलिव्हरी होणार असून सुद्धा शिजरिंगचे प्रकार आपणास ऐकायला मिळतात. जर तसे असेल तर उच्च शिक्षण घेऊन वैद्यकीय सेवा करण्यात काय अर्थ ? फक्त पैशासाठीच का ? अशी सध्या ग्रामीण जनतेत खूप मोठा चर्चेचा विषय होऊन बसला आहे. मात्र याला अपवाद म्हणून शिंदाड आरोग्य उपकेंद्रामधील संगीता दुबेले या आगळ्यावेगळ्या महिला ठरल्या आहे. गेल्या काही वर्षापासून त्या आरोग्य उपकेंद्रात सेवा बजावत आहे. त्या २४ तास सेवा आरोग्य केंद्रात बजावत असतात. त्यांच्याकडे कोणत्याही वेळेला डिलिव्हरीसाठी पेशन्ट आल्यास त्या शंभर टक्के नैसर्गिक डिलिव्हरी होण्यासाठी प्रयत्न करतात आणि त्यात त्या यशस्वीही होतात. अशा या संगीता डुबले यांना परिसरातून नागरिकांचा सलाम असतो. खेडे गावांमध्ये उत्पन्नाचे साधन फक्त शेती असून, या शेतीतून मिळणाऱ्या मिळकतीवर कसाबसा शेतकरी आपला उदरनिर्वाह भागवत असतो. त्यातच मुलगी अथवा सून यांच्या जेव्हा डिलीव्हरीचा प्रश्न येतो तेव्हा अनेक ठिकाणी खर्चाच्या धाकामुळे शेतकरी हवालदिल होतात.यामुळे शेतकरी मेटाकुटीला येतो. मात्र या परिसरात संगीता डुबले यांचं नाव प्रसिद्ध झाले असून अनेक स्त्रियांचे आणि गरिबांचे आशीर्वाद त्या सध्या घेत आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील यशस्वी महिला म्हणून त्यांचं नाव लौकीक आहे. शिंदाड या गावी जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे यांच्या प्रयत्नातून प्राथमिक आरोग्य केंद्र नुकतेच उदयाला आले आहे. या केंद्राचे उद्घाटन खासदार उमेश पाटील आमदार किशोर आप्पा पाटील जि प सदस्य मधुकर काटे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. त्यावेळी खासदार उन्मेश पाटील यांच्या हस्ते संगीता दुबेले यांचा सत्कार करण्यात आला. म्हणून परिसरातील नागरिकांच्या वतीने त्यांच्या कार्याला सलाम