शिंदाड येथे महीला दिन मोठ्या उत्सवात साजरा

शिंदाड येथे महीला दिन मोठ्या उत्सवात साजरा

शिंदाड येथे महीला दिन मोठ्या उत्सवात साजरा

ईसा तडवी
मिडिया वार्ता न्युज
पाचोरा तालुका प्रतिनिधी
मो. 9860884602

पाचोरा : – जळगाव जिल्हातील पाचोरा तालुक्यातील शिंदाड येथे आज रोजी महिला दिनानिमित्त *एडवोकेट अभय पाटील यांच्या निर्भय लोकसंवाद फौंडेशन* व * महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान *उमेद* च्या तर्फे तालुका दक्षता समितीच्या सदस्य सौ. पुष्पांजली तांबे, सौ. अफसाना सय्यद व सौ. ज्योत्स्ना परदेशी यांनी आजी – माजी सैनिक यांच्या मातांचे सत्कार करण्यात आले. शिंदाड येथे राम मंदिरात आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती रजनीताई शरद पाटील हे होते, कार्यक्रमास मंगलबाई पाटील लिलाबाई पाटील या माजी सरपंच व समाधान पाटील चेअरमन विका सोसायटी शिंदाड हे प्रमुख पाहुणे म्हणून होते.
कार्यक्रमाची सुरवात राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीमाई फूले, राणी लक्षमीबाई, पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर व भारताच्या पोलादी महिला प्रधानमंत्री स्व. इंदीरा गांधी , यांच्या प्रतिमेच पुजन ताईसो. रजनीताई शरद पाटील व माजी सरपंच श्रीमती लीलाबाई विक्रम पाटील , ग्राम पंचायत सदस्य मीराबाई ईदल परदेशी याच्या हस्ते करण्यात आले.
शिंदाड गावातील सुमारे 40 मतांनी मनावर दगड ठेवून आपली मुले देशसाठी सीमेवर लढायला पाठवली ते आज आपल्या जीवाची परवा न करता भारत देशासाठी आपले कर्तव्य बजावत आहेत. निर्भय लोकसंवाद फाउंडेशन या संस्थेतर्फे अश्या सैनिकांच्या आईचा शाल श्रीफळ व फूल देऊन त्याचा सत्कार करण्यात आला. तुम्हाला माहिती आहे कार्यक्रमाला सुंदर गावातील महिला बचत गटाच्या सदस्य मोठ्या प्रमाणात हजर होत्या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालन अफसाना सय्यद यांनी केले तर प्रास्ताविक पुष्पांजली तांबे यांनी केले. याप्रसंगी श्रीमती रजनीताई पाटील, लीलाताई पाटील, पुष्पांजली तांबे, जोत्सना परदेशी यांनी मनोगत व्यक्त केले. सैनिक मातांनी देखील महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर त्यांचा गौरव ही त्यांच्यासाठी अमूल्य व अनमोल भेट असल्याचे मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा निर्भय लोकसंवाद फाउंडेशन या संस्थेचे अध्यक्ष एडवोकेट अभय शरद पाटील यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाच्या शेवटी सौ. जोत्सना परदेशी यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here