महिला दिन उत्सव सामाजिक परिवर्तनाचा असावा भजन स्पर्धा प्रसंगी मोहन पंचभाई यांचे प्रतिपादन

महिला दिन उत्सव सामाजिक परिवर्तनाचा असावा

भजन स्पर्धा प्रसंगी मोहन पंचभाई यांचे प्रतिपादन

महिला दिन उत्सव सामाजिक परिवर्तनाचा असावा भजन स्पर्धा प्रसंगी मोहन पंचभाई यांचे प्रतिपादन

✍मुकेश मेश्राम✍
ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी
जिल्हा. भंडारा

भंडारा/पवनी:-महिलांचा आत्मसन्मान संविधानिक कायम असावा याचा जागर करण्या हेतू जागतिक महिला दिन उत्सव साजरा करतांना सामाजिक परिवर्तनाचे कार्यक्रम असावेत असे प्रतिपादन कांग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई यांनी केले. ते भजन स्पर्धेच्या उदघाटन कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.
शहर कांग्रेस, महिला कांग्रेस, युवक कांग्रेस, एन. एस. यु. आय. तथा सर्व सेल तर्फे जागतिक महिला दिनाचे आयोजन गांधी चौक पवनी येथे करण्यात आले होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे उदघाटक माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे होते. अध्यक्ष म्हणून मोहन पंचभाई तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा महिला कांग्रेस अध्यक्ष जयश्री बोरकर, जिल्हा अनुसूचित जाती महिला कांग्रेस अध्यक्ष मंजुषा चव्हाण, ठाणेदार जगदीश गायकवाड, पीएसआय सुमित्रा साखरकर, जिल्हा युवक कांग्रेस अध्यक्ष पवन वंजारी, जिल्हा उपाध्यक्ष विकासभाऊ राऊत, प्रकाश पचारे,शहर अध्यक्ष मनोहर उरकुडकर, माजी नगरसेवक राकेश बिसने,माजी नगरसेवक गोपाल नंदरधने, माजी नगरसेवक वंदना नंदागवली, नंदा सलामे, मीरा उरकुडकर, मनोहर मेश्राम, शशिकांत भोगे, माजी न. प. उपाध्यक्ष कमलाकर रायपूरकर, सोशल मिडिया प्रमुख अशोक पारधी, किशोर मेश्राम अध्यक्ष नावी समाज पवनी व इतर उपस्थित होते.
पंचभाई पुढे म्हणाले मनुष्याला मोठे होण्यासाठी महिला असणाऱ्या आईची गरज असल्याचे सांगून ती नसेल तर ‘स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी’ या म्हणीतून आईची महत्ती उपस्थितांसमोर मांडली. डॉ. बाबासाहेबांनी महिलांसाठी संविधानात हिंदू कोड बिल लिहून ठेवले. राजकीय क्षेत्रात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण दिले असल्याचे सांगून आज अनेक क्षेत्रात महिलांची झालेली प्रगती वाखाणण्याजोगी आहे. देशाच्या सर्वोच्च ठिकाणी महिलांची वर्णी लागल्याचा इतिहास देखील असल्याचे सांगून महिलांनी आत्मनिर्भर होण्यासाठी पंचभाई यांनी आव्हान केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष बंडूभाऊ सावरबांधे यांनी महिलांना सक्षम बनविण्याचे काम कांग्रेस पक्षाने केल्यामुळे अनेक क्षेत्रात महिला पुरुषांपेक्षाही पुढे असल्याचे सांगून महिला दिनाचे महत्त्व विशद केले. दरम्यान मोहन पंचभाई यांच्या सांस्कृतिक कार्यावर प्रकाश टाकताना अनेक कलावंतांना निर्माण केल्याचे सांगितले. महिला अध्यक्ष जयश्री बोरकर यांनी महिलांनी चूल आणि मुल यातुन बाहेर पडून महिलांचे हक्क व अधिकार समजून घेण्यासाठी भारतीय संविधानाचे वाचन करावे असा मौलिक सल्ला दिला. याप्रसंगी ठाणेदार जगदीश गायकवाड, पीएसआय सुमित्रा साखरकर यांनीही मार्गदर्शन केले.
सुमधूररित्या संपन्न झालेल्या भजन स्पर्धेत पवनीतील दर्जनो भजन मंडळांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. यामध्ये प्रथम पारितोषिक एकवीरा माता भजन मंडळ पवनी यांनी पटकाविला असून रोख ५००० रुपये व प्रशस्तीपत्र असे बक्षिसाचे स्वरूप आहे. दुसऱ्या क्रमांकाचे अलंकार भजन मंडळ पवनी यांना तर गुरुदेव बाळ भजन मंडळ पवनी हे तृतीय क्रमांकावर राहिले. यामध्ये व्दितीय क्रमांकाच्या मंडळाला ३००० तर तृतीय २००० रुपये तथा प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी मीना जीभकाटे, ब्राम्हदास बागडे, प्रा. सुखदेवे यांनी परीक्षकांचे काम पाहिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भंडारा जिल्हा महिला कांग्रेस महासचिव माधुरीताई तलमले यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन विवेक गायधने गुरुजी तर आभार प्रदर्शनं महेश नान्हे पवनी तालुका अध्यक्ष एन एस यू आय यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजेश तलमले अनिकेत गभने,अमित पारधी,चेतन हेडाऊ,अंकुश धुरई,इर्शाद पटेल, कु लक्ष्मी मेश्राम व काँग्रेस च्या सर्व सेल कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.