जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून गरजु व निराधार महिलांना केले साड्यांचे वाटप तसेच मुलींना खेळामध्ये प्रेरणा मिळावी म्हणुन केले खेळाचे साहित्य वाटप

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून गरजु व निराधार महिलांना केले साड्यांचे वाटप तसेच मुलींना खेळामध्ये प्रेरणा मिळावी म्हणुन केले खेळाचे साहित्य वाटप

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून गरजु व निराधार महिलांना केले साड्यांचे वाटप तसेच मुलींना खेळामध्ये प्रेरणा मिळावी म्हणुन केले खेळाचे साहित्य वाटप

✒धनराज आर. वैरागडे ✒
9421527972
गडचिरोली उपजिल्हा प्रतिनिधी

गडचिरोली : – जागतिक महिला दिनानिमित्त उप पोलिस स्टेशन देचलीपेठा हद्दीतील पेठा गाव येथे मा.पोलीस अधीक्षक श्री अंकित गोयल सा., मा. अपर पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे सा.,मा.अपर पोलीस अधीक्षक श्री समीर शेख सा.,मा.अपर पोलीस अधीक्षक श्री अनुज तारे सा.संकल्पनेतून व उपविभागीय पोलिस अधिकारी श्री सुजितकुमार क्षीरसागर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ” जागतिक महिला दिनानिमित्त” पेठा येथे उप पो स्टे देचली पेठा व सावित्रीमाता महिला ग्रामविकास समिती, देचली यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य बेबी मडावी-महीला मेळावा-2022 चे आयोजन करण्यात आले होते. सदर महीला मेळाव्याची सुरुवात मौजा- पेठा येथील सरपंच शांताबाई सिडाम यांच्या अध्यक्षतेखाली व विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, दुर्गाराणी, माता रमाबाई, अहिल्याबाई होळकर यांचे प्रतिमेचे पूजन करून प्रतिमाला पुष्पहार अर्पण करण्यात आले.
सदर मेळाव्यात आश्रम शाळा पेठा येथील मुलीकरिता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये शाळेतील मुलींनी नृत्य कौशल्य सादर केले, उत्कृष्ट नृत्य सादर करणाऱ्या मुलींना रोख पारितोषिक देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले. सदर मेळाव्यात विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महीलांचा सत्कार करण्यात आला.
सदर मेळाव्यात संघर्ष लोकसंचलीत साधन केंद्र जिमलगट्टा यांच्या तर्फे हातानी मातीची बनवलेली भांडी व खेळणी तसेच शोभेच्या वस्तू यांचे प्रदर्शन भरवण्यात आले त्याच बरोबर तेजस्विनी वनधन गट जिमलगट्टा यांच्या तर्फे अरण्यातील विविध वस्तू चे प्रदर्शन भरविण्यात आले होते.
वैद्यकीय अधिकारी डॅा. बिश्वास यांनी महिलांच्या समस्या विषयी मार्गदर्शन केले व महिला व मुलींना औषधांचे वाटप करण्यात आले
उप पोस्टे देचली पेठा चे प्रभारी अधिकारी पोलीस उप निरीक्षक सुधीर साठे यांनी गडचिरोली पोलिस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून महिला साठी राबिवण्यात येणाऱ्या विविध योजना व कोर्स विषयी मार्गदर्शन केले तसेच महिलांचे कायदेविषयक अधिकारांची माहीती दिली सदर कार्यक्रमात हद्दीतील गरजू व निराधार महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले त्याचबरोबर CRPF च्या 9 बटालियन तर्फे आश्रमशाळा पेठा येथील मुलींना व्हॉलीबॉल चे किट भेट देण्यात आली
पोलीस स्टेशन हद्दीतील शिक्षिका, बचत गट गटाचे अध्यक्ष महिला,सचिव हॉस्पिटल मधील वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, आदी महिला तसेच शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी सदर मेळावा करता उपस्थित होते.
सदर मेळाव्या करीता उप पोलीस स्टेशन देचलीपेठा हद्दीतील जेष्ठ तसेच प्रतिष्ठित महीला असे 250 ते 300 महीला उपस्थित होते.
तसेच सदर महीला मेळाव्यातील उपस्थित महिलांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती मेळावा यशस्वी होण्यासाठी उपपोस्टे चे अधिकारी पोउनि वर्मा ,पोउनि माकणे तसेच सीआरपीएफ चे असिस्टंट कमांडन्ट मो शकील सा. तसेच कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले सदरचा महिला मेळावा हा कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत पार पाडण्यात आला आहे.