प्रेमाचा शेवट ठरला महाभयंकर,
महिलेला लग्नाचे अमिष दाखवून 2 वर्ष अत्याचार
शेवटी युवक पोलिस कोठडीत
✍त्रिशा राऊत✍
नागपूर जिल्हा ग्रामीण
प्रतिनिधी -9096817953
नागपूर : : -सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की,अलीकडच्या काळात लिव्ह इन रिलेशनशिपला बहुतेक युवक आणि युवती प्राधान्य देत असल्याचं समोर येतंय. शहरी भागात याचं प्रमाण जास्त आहे. कोणत्याही बंधनात न अडकता सोबत राहणं अलीकडच्या पिढीला पसंत असल्याचे अनेक रिपोर्टही प्रसिद्ध झाले आहेत. मात्र, ज्या नात्याला कोणताच आधार नाही. ते नातं टिकणार तरी कसं, असाही विचार करणारा एक मतप्रवाह आहे. शेवटी कोणत्याही गोष्टीला चांगली आणि वाईट अशा दोन्ही बाजू असतातच. नागपुरातून लिव्ह इन रिलेशनशिपचं असंच एक प्रकरण समोर आलं आहे. यामध्ये पीडित महिलेची फसवणूक झाली. हे त्या महिलेला तब्बल दोन वर्षांनंतर लक्षात आलं. पतीनं सोडल्यानं या महिलेनं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणं पसंत केलं होतं. मात्र, हेच लिव्ह इन रिलेशनशिप ज्या युवकासोबत ठेवलं. त्या युवकाने महिलेची फसवणूक केली.
लव्ह इन रिलेशनशिपचा शेवट भयंकर झाल्याची घटना नागपुरातून समोर आल्यानं लिव्ह इनमध्ये राहणारे सजग होण्याच शक्यता आहे. नागपुरात एका महिलेनं पती सोडून गेल्यानं महिलेनं लिव्ह इन रिलेशनशिपचा पर्याय निवडला. संबंधित महिला तब्बल 2 वर्ष एका युवकासोबतलिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिली. मात्र, काही दिवसांपूर्वी युवकाचं अन्य तरुणीसोबत साक्षगंधाचा कार्यक्रम झाला. हे पीडितेला कळालं. यानंतर पीडितेनं संबंधित युवकाला जाब विचारायला सुरुवात केली. यावेळी युवकाने पीडितेला शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली होती.फसवणूक झाल्याचं कळताच पीडितेनं पोलिसात जायचं ठरवलं. यानंतर महिलेनं तक्रार नोंदवली. या फसवणूक प्रकरणी नागपुरच्या पारशिवनी पोलिसांनी अत्याचाराचा गुन्हा दाखल करुन घेतला. यानंतर तातडीनं चक्र फिरली आणि युवकाला अटक करण्यात आली आहे. स्वप्निल किसन बर्वे असं युवकाचं नाव आहे. तर पीडित महिला आपल्या दोन मुलांसह पतीपासून वेगळी राहते. महिलेच्या याच गोष्टीचा फायदा घेत स्वप्निलने पीडितेला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं होतं. त्यानंतर लग्नाचं अमिष दाखवून तिच्यावर 2 वर्ष अत्याचार केले. यानंतर या मुलानं अन्य मुलीसोबत साक्षगंधाचा कायक्रम केला होता. हे पीडितेच्या लक्षात येताच तिला तिची फसवणूक झाल्याचं लक्षात आलं. यानंतर तिनं तक्रार नोंदवली आणि युवकाला अटक झाल्यानंतर न्यायालयात हजर केले असता न्यायालयानं त्याला 11 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत सुनावली आहे.