ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी उभारण्यात येणार एक महत्त्वाची वास्तू

55

सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगांव मौजे नायगांव येथे महाज्योती संस्थेमार्फत 200 मुलींसाठी उभारण्यात येणार निवासी स्पर्धा प्रशिक्षण संकुल

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी उभारण्यात येणार एक महत्त्वाची वास्तू

मीडिया वार्ता न्युज
११ मार्च, मुंबई: सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगांव मौजे नायगांव येथे महाज्योती संस्थेमार्फत 200 मुलींसाठी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) व अन्य स्पर्धा परीक्षेच्या प्रशिक्षणासाठी निवासी स्पर्धा प्रशिक्षण संकुल उभारणे. सर्व सोयी सुविधेसह प्रशिक्षण केंद्र सुरु करणे व चालविणे याकरिता 24 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे, यासंदर्भातील शासन निर्णय 7 मार्चरोजी जारी करण्यात आला आहे.

महाज्योती ही स्वायत्त संस्था असून विमुक्त जाती भटक्या जमातीइतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग तसेच इतर वंचित व दुर्लक्षित घटकातील युवक व युवतींसाठी विविध उपक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी महाज्योती या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे.

व्यवस्थापकीय संचालकमहाज्योती संस्थेने दिलेल्या प्रस्तावानुसार 100 विद्यार्थिनींची निवास व्यवस्था सर्व अत्याधुनिक सुविधांसह उभारण्यासाठी.  इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील उजव्या बाजूस खुल्या जागेत 100 विद्यार्थिनीकरिता 50 रूम बांधण्यासाठी 30 लाख रूपये, 100 विद्यार्थिनींना निवासाची व्यवस्था करणे रूम फर्निचर व सुविधा यासाठी एकूण 50 रुममध्ये प्रत्येकी 2 टेबल, खुर्च्याकपाट, कॉट गाद्यांकरिता 5 लाख रूपये, इमारत डागडुजी बाथरूमरंगकामइलेक्ट्रीक व इतर बाबी (CCTV, अग्नीशमन यंत्रणाइत्यादी) या करिता अंदाजित 10 लाख रूपयेकार्यालयीन सोयी-सुविधा व उपकरणेटेबलखुर्च्याकपाटसंगणकइंटरनेट सुविधारंगकामइलेक्ट्रिकल व इतर बाबीसाठी (CCTV, अग्नीशमन यंत्रणाइत्यादी) याकरिता 10 लाख रूपये, मेस उभारणीडायनिंग टेबलखुर्च्या सेटकेटरर्स व्यवस्था जेवणथाळ्या वाट्याग्लासचमचे इत्यादी साहित्यसंपूर्ण व्यवस्था करणे याकरिता अंदाजित 10 लाख रूपये खर्च करण्यात येणार आहे. 

हे आपण वाचलंत का?

  • प्रवास महाराष्ट्रातील तीन नारीशक्ती पुरस्कार विजेत्या महिलांचा
  • वेबसिरीजवरील महिलांच्या अश्लिल चित्रणावर महाराष्ट्र पोलीस घालणार बंदी
  • महाराष्ट्राचे पाणी गुजरातला देणार नाही, जलसंपदा मंत्री जयंत पाटील

 

डिजिटल क्लासरुम व्यवस्था3 क्लासरूम मधील डेस्क बेंचप्रोजेक्टर, Inter- active पॅनेलटेबलइंटरनेट सुविधा व इतर बाबी  १० लाख रूपये खर्च,वाचनालय व अभ्यासिका50 बैठक व्यवस्थेसह टेबलखुर्च्यापुस्तक कपाटसंगणकइंटरनेट सुविधारंगकामइलेक्ट्रिकल व इतर बाबी (CCTV, अग्नीशमन यंत्रणाइत्यादी याकरिता अंदाजित  20 लाख रूपये, वाचनालय व अभ्यासिका करीता पुस्तक खरेदीएकूण 1 लक्ष पुस्तके अभ्यासिकेकरिता 20 लाख रूपये, प्रशिक्षणासाठी मैदान व्यवस्था तयार करण्यासाठी अंदाजित 10 लाख रूपये,सुसज्ज व्यायाम शाळा बांधणीव्यायाम शाळा उभारणी व साहित्य खरेदी करणे या करिता 10 लाख रूपये,सभागृह बांधणीप्रेक्षागृह उभारणी व इतर आवश्यक बैठक व्यवस्था व साउंड व्यवस्था याकरिता 45 लाख रूपये,प्रशिक्षणासाठी नवीन जमीन खरेदीमहाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या जागेच्या शेजारी लागून असलेली मोकळी जागा याकरीता. 60 लाख रूपये  असे एकूण सर्व कामांसाठी  एकूण अंदाजित खर्च 24 कोटी रूपये इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे.