टायगर ग्रुप बल्लारपुर तर्फे गौ माता ला जीवनदान

टायगर ग्रुप बल्लारपुर तर्फे गौ माता ला जीवनदान

टायगर ग्रुप बल्लारपुर तर्फे गौ माता ला जीवनदान

✍सौ .हनिशा दुधे✍
बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
97642 68694

बल्लारपूर : – बल्लारपूर शहरातील रवींद्र नगर वार्ड तिथे अनेक दिवसांपासून एक गायचा वासरू जखमी अवस्थेत होतं परंतु त्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी या गोष्टीची दखल घेतली नाही परंतु जवा ही बाब टायगर ग्रुप सदस्यांना माहीत झाली तेव्हा क्षणाचाही विलंब न करता टायगर ग्रुप संघटनेचे सदस्यांनी तात्काळ त्या बछड्याला पशु वैद्यकीय अधिकारी बल्लारपूर यांच्याकडे नेऊन त्याचा उपचार केला व त्यानंतर प्यार फाउंडेशन चंद्रपूर यांना पुढील उपचारासाठी स्वाधीन केले या कार्याला करणारे शिवाजी चांदेकर, सागर राऊत, आदित्य शिंगाडे व कुणाल बहुरिया आधी उपस्थिती होते.