एटापल्ली ते गटटा या 36 किमी रस्त्याची अवस्था अत्यंत दुरदैनी

एटापल्ली ते गटटा या 36 किमी रस्त्याची अवस्था अत्यंत दुरदैनी

एटापल्ली ते गटटा या 36 किमी रस्त्याची अवस्था अत्यंत दुरदैनी

मारोती कांबळे
मीडिया वार्ता न्युज
गडचिरोली जिल्ह्या ग्रामीण प्रतिनिधी
मो.नं.9405720593

एटापल्ली ते गटटा 36 की मी रस्त्याची अवस्था अंत्यंत खराब असुन या भागात आदीवासी
नागरिक राहतात विविध शासकीय व खाजगी कामाकरिता नागरिक एटापल्ली ,गडचिरोली, चंद्रपूर व नागपूर जाण्यासाठी अंदाजे 70 गावाचा नागरिकांना गटटा या गावावरून एटापल्ली ला यावे लागते परंतु रस्ता खराब असल्यामुळे येणे जाणे त्रासदायक व धोकादायक झाले आहे आपण या विषयावर लक्ष देऊन ही समस्या तांतकाळ सोडवावी या मागणीला अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ गडचिरोली यांनी लेखी उत्तरं देऊन मागणी मान्य झाल्याचे कळवले खालील प्रमाणे
गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील गटटा रस्ता हा राज्यमार्ग क्र.381 या रस्त्याचे बांधकाम बी.आर.ओ मार्फतजवळपास 25 ते 30 वर्षापूर्वी डांबरीकरण काम झाले असून त्यानंतर रस्त्यावर नुतनीकरणाचे काम झालेले नाही. त्या रस्त्यावर हेडरी गावाजवळ लोहखनिज खदान उत्खनन केलेले खनिज वाहतुकी करिता याच रस्त्याचा नेहमी वापर होत असतो.30 ते 40 मे.टन प्रति ट्रक प्रमाणे अंदाजे 125 ते 150 ट्रक ये जा करतात यामुळे रस्त्याची अतिशय देणवस्था झाली आहे ,सदर रस्त्यावरील एक भाग एटापल्ली ते गटटा पुरवणी दुरुस्ती(FDR) अंतर्गत सा. क्र.78/580 ते 83/380 आणि 85/380 ते 86/580 मध्ये एकूण 6 किमी रस्ता मागणी नुसार मंजूर झाला सदर कामाची निविदा प्रक्रिया प्रगतीत आहे प्रकिया पूर्ण होताच कामास सुरुवात होईल भारतीय कम्युनिस्ट पार्टी एटापल्ली ता.सचिव कॉम्रेड सचिन मोतकुरवार, कॉम्रेड सुरज जक्कुलवार,कॉम्रेड विशाल पुज्जलवार यांचा मागणीला व पाठपुरावा ला पुन्हा एकदा यश मागणी मंजूर