मधमाश्यांपासून वाचण्यासाठी तरुण कालव्यात उतरला आणि…

मधमाश्यांपासून वाचण्यासाठी तरुण कालव्यात उतरला आणि…

गोसे धरणाच्या डाव्या कालव्यात संकट टाळण्यासाठी कॅनल मध्ये कुदला आणि मृत्यूला कवटाळला

✍मुकेश मेश्राम✍
जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण भंडारा
📱7620512045📱

भंडारा:-अस म्हणतात काळ जर तुमची वाट पाहत असेल तर मृत्यु निश्चित आहे. याची प्रचिती भंडारा जिल्ह्याच्या पवनी या शहरात आज 11 मार्च ला पाहायला मिळाली आहे.चारचाकी वाहनाने शेतावर जात असताना अचानक मधमाशांच्या हल्ल्यात स्वतःचा जीव वाचण्याकरिता गोसे खुर्द च्या डाव्या कॅनेल मध्ये उडी घेतली व त्याच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारला घडली असून मृतकाचे नाव महेश रघु रेवतकर 25 रा. शनिवारी वार्ड पवनी असे आहे.

महेश रेवतकर हा 25 वर्षीय युवक घरून शेतावर जाण्यासाठी निघाला होता.दरम्यान अचानक त्याच्यावर मधमाशांनी हल्ला चढवल्याने तो सैरावैरा झाला आणि स्वतःला बचावण्यासाठी वाहात असलेल्या गोसे धरणाच्या डाव्या कालव्यात उडी घेतली.परंतु पाण्याचा प्रवाह इतका जास्त असल्यामुळे त्याला कॅनलच्या बाहेर निघता आले नाही व त्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला.अखेर त्याचा मृतदेह सापडल्यामुळे ही घटना उघडकीस आली आहे.

ही घटना वाऱ्यासारखी परिसरात पसरताच बघ्यांनी एकच गर्दी केली होती. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले व मृतदेह बाहेर काढला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पवनी येथील सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.या घटनेचा पुढील तपास पवनी पोलिस करीत आहे.मात्र या घटनेमुळे रेवतकर कुटुंबावर दुःखाचे संकट कोसळले असून या घटनेमुळे पवनी शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.