सातगाव ते वाडीशेवाळे रस्त्याची दयनीय अवस्था रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता

सातगाव ते वाडीशेवाळे रस्त्याची दयनीय अवस्था रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता

सातगाव ते वाडीशेवाळे रस्त्याची दयनीय अवस्था रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता

ईसा तडवी
मिडिया वार्ता न्युज
पाचोरा तालुका प्रतिनिधी
मो. 9860884602

पाचोरा : प्रतिनिधी : – खानदेश आणि मराठवाड्याला जोडणारा सातगाव ते पाचोरा रस्ता असून सातगाव ते वाडीशेवाळे रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून रस्त्यावर खड्डेच खड्डे पडलेले आहेत.

खानदेशातून मराठवाड्यात आणि मराठवाड्यातून खानदेशात ये-जा करण्यासाठी जवळचा मार्ग असलेला पाचोरा- सातगाव- घाटनांद्रा मार्ग असून, मिनिटामिनिटाला वाहने ये-जा करत असतात. मात्र लोकप्रतिनिधींचे लक्ष दुर्लक्ष झाले आहेत.
या मार्गापासून पश्चिमेकडे चाळीसगाव घाट ५०-६० किलोमीटर आणि पूर्वेकडे अजिंठा घाट सुद्धा ५०-६० किलोमीटर अंतरावर आहेत. म्हणून पाचोरा, भडगाव, एरंडोल परिसरातील असंख्य वाहने या रस्त्याने ये-जा करत असतात. मात्र सध्या सातगाव ते वाडीशेवाळे दहा किलोमीटरचा रस्ता खूपच खड्डेमय झाल्याने, वाहनधारकांना वाहन चालविणे खूप जिकरीचे झाले आहेत. अपघात होण्याची दाट शक्यता असून, कोणाचा जीव जाण्या अगोदर रस्ता दुरुस्त होणे खूप गरजेचे आहे. आजारी लोकांना पाचोरा, जळगाव घेऊन जात असताना तसेच विशेषतः महिला वर्गाला जास्त त्रास भोगावा लागत आहेत. लोकप्रतिनिधींनी तात्काळ सदर रस्त्याकडे लक्ष घालून रस्ता दुरुस्त करावा. अशी मागणी वाहनधारक व नागरिकांनी केली आहे.
याच रस्त्यावर दोन ते अडीच वर्षापूर्वी डांबरीकरणाचा थर देण्यात आला होता. मात्र त्यावेळी ते काम निकृष्ट झाल्याने डांबराचा भाग तर निघून गेलाच, पण त्यामुळे खड्डे निर्माण होऊन वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे .व येत्या आठ दिवसात सातगाव डोंगरी ते सार्व पीप्री वाडी . रस्त्याचे नूतनीकरण न झाल्यास येणाऱ्या जिल्हापरिषद व पंचायतसमिती निवडणूकांवर या गावातील सुज्ञ नागरिक मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याची चर्चा सुरु आहे. म्हणून आता तरी त्वरित नूतनीकरण सुरू करावे अशी सुज्ञ नागरिकान कडून मागणी होत आहे.