लोकसेवा विद्यालय सावली (वाघ) येथील शिक्षक व विद्यार्थ्यांचा प्रहार जनशक्ती पक्षाकडे पाठपुरावा. गावामधून होणारी अवजड वाहतूक बंद करण्यासंदर्भात दिले निवेदन.

लोकसेवा विद्यालय सावली (वाघ) येथील शिक्षक व विद्यार्थ्यांचा प्रहार जनशक्ती पक्षाकडे पाठपुरावा.

गावामधून होणारी अवजड वाहतूक बंद करण्यासंदर्भात दिले निवेदन.

लोकसेवा विद्यालय सावली (वाघ) येथील शिक्षक व विद्यार्थ्यांचा प्रहार जनशक्ती पक्षाकडे पाठपुरावा. गावामधून होणारी अवजड वाहतूक बंद करण्यासंदर्भात दिले निवेदन.

✒करण विटाळे✒
हिंगणघाट तालुका ग्रामीण
प्रतिनिधी : 8806839078

हिंगणघाट : तालुक्यामध्ये येत असलेल्या सावली वाघ (वाघ) येथील
लोकसेवा विद्यालयातील शिक्षक व विद्यार्थ्यांमारफत गावामधून होणारी अवजड वाहतूक बंद करण्यासंदर्भात देण्यात आले निवेदन.
सावली (वाघ) ते सेलू या भागात मोठ्या प्रमाणात गिट्टीखदान असल्यामुळे येथील जे काही अवजड वाहतूक आहे ती सर्व वाहतूक सावली या गावच्या मुख्य रस्त्यावरून होत असते, त्यामुळे बस स्थानक सावली (वाघ) ते सेलू हा रस्ता संपूर्ण खड्डेमय व जिर्णोद्धार झाला आहे. व गावाबाहेर शाळा असल्यामुळे या रस्त्याने विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असतात त्यामुळे विद्यार्थ्यांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो, व अपघाताला सामोरे जावे लागते, अवजड वाहतूकिमुळे धुळीचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे त्यामुळे गावातील नागरिकांमध्ये श्वसनाच्या आजाराचेही प्रमाण वाढत चालले आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यस धोका निर्माण होतो आहे असे विद्यालयातील शिक्षकांच्या लक्षात येताच शिक्षक व विद्यार्थ्यांनी गावातील मुख्य रस्त्यावरून होणारी अवजड वाहतूक बंद करण्यात यावी यासाठी थेट प्रहार जनशक्ती पक्षाकडे निवेदन सादर केले आहे. यावेळी प्रहार जनशक्ती पक्ष सावली (वाघ) चे शाखाप्रमुख दिपक पावडे, ग्रा. पं. सदस्य पराग तिखट, प्रकाश मन्ने, मारोती पढाल, करण विटाळे, गजानन जरिले, ईश्वर पुरी, गजानन कुंभारे, रोशन बरबटकर लोकसेवा विद्यालयाचे प्राचार्य. मा. तिजारे सर, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.