मौजा केसलवाडा येथे आज पासुन बैलांची शंकरपट
✍ भवन लिल्हारे ✍
* भंडारा उपजिल्हा प्रतिनिधी *
📱 8308726855 📱
📞 8799840838 📞
भंडारा :- भंडारा जिल्यातील साकोली तालुक्यात मौजा मुरमाडी, सावरी, गडेगाव, सोमलवाडा, रेंगेपार, गराडा, सिपेवाडा, चान्ना, धानला, खुटसावरी, माडगी यांच्या संयुक्त विद्यमाने स्व लक्ष्मीबाई निर्धनराव वाघाये पाटील यांच्या स्मृति पित्यर्थ केसलवाडा वाघ येथे दिनांक १४ ते १६ मार्च २०२२ सोमवार व मंगळवार असे दोन दिवशिय शंकर पटाचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ११:०० ते सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत स्पर्धा सुरू राहिल अशी घोषना केली आहे. या बैलांच्या शंकर पटात ” प्रथम बक्षीस ७१,००० ( एकाहत्तर हजार रुपये ) द्वितीय बक्षीस ” ५१,००० ( एक्कावन हजार रुपये ) तर तृतीय बक्षीस ” ३१,००० ( एकतीस हजार रुपये ) व चतुर्थ बक्षीस २१,००० ( एके विश हजार रुपये ) देण्यात येणार आहे. तरीपण या शंकर पट प्रेमींना जास्तीत जास्त संखेत उपस्थिती दर्शवावी असे आव्हानही आयोजकांनी केले आहे. आणि माझी आमदार मा. श्री. सेवक भाऊ वाघाये यांनी जनतेला कळवीले आहे. आणी ही शंकरपट बऱ्याच कालावधि नंतर आपल्या परिश्रमातून साकार करण्याचे आयोजन करण्यात आले आहे.