महिलांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम करणारी वेशभूषा स्पर्धा महिला दिनानिमित्त नवेगाव हुंडेश्वरी शाळेचा उपक्रम*महिलांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम करणारी वेशभूषा स्पर्धा महिला दिनानिमित्त नवेगाव हुंडेश्वरी शाळेचा उपक्रम

महिलांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम करणारी वेशभूषा स्पर्धा

महिला दिनानिमित्त नवेगाव हुंडेश्वरी शाळेचा उपक्रम*महिलांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम करणारी वेशभूषा स्पर्धा

महिला दिनानिमित्त नवेगाव हुंडेश्वरी शाळेचा उपक्रम

महिलांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम करणारी वेशभूषा स्पर्धा महिला दिनानिमित्त नवेगाव हुंडेश्वरी शाळेचा उपक्रम*महिलांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम करणारी वेशभूषा स्पर्धा महिला दिनानिमित्त नवेगाव हुंडेश्वरी शाळेचा उपक्रम

*अरुण रामुजी भोले*
*नागभिड तालुका प्रतिनिधी*
*9403321731*

नागभिड-जागतिक महिला दिनानिमित्त जि. प. उच्च प्राथमिक शाळा नवेगाव हुंडेश्वरी पं. स. नागभीड द्वारा शाळेत विविध कार्यक्रमाचे आयोजन करून महिला दिन संपन्न करण्यात आला.
केंद्रप्रमुख प्रदीप मोटघरे, मुख्याध्यापक श्रीधर मेश्राम, श्री नरेंद्र वासनिक विषय शिक्षक, तथा कार्यक्रमाचे संयोजक श्री संजय येरणे सर यांच्या अथक परिश्रमातून, भाग्यश्री गुरनुले सहकरिता यांच्या सूत्र निवेदनातून सादर कार्यक्रमाची नियोजनबद्ध रूपरेषा आखण्यात आली.
निमित्ताने कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कु. रेश्मिता गुरनुले शिक्षण सहकारिता यांनी भूषवले, विद्यार्थ्यांनी आपल्या आईचा सन्मान किती करतो, तीला आपल्या बालपणी शिवीगाळ तर करत नाही हा आपल्या मनाला प्रश्न विचारा, यातूनच महिला सन्मानाची भावना आपल्यात रुजवावी असे अनमोल विचार मांडले, तर वर्ग सातवीच्या विद्यार्थिनी क्षमा नंदपुरकर, समिक्षा ऊईके, लक्ष्मी गुरनुले, विशाखा गुरनुले, ज्ञानेश्वरी गुरनुले, समिक्षा गुरनुले, ह्या बालसभा उपक्रम द्वारा विद्यार्थिनी मंचावर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. प्रसंगी विद्यार्थ्यांची महिलांच्या कार्य कर्तुत्वावर ओजस्वी भाषण स्पर्धा घेण्यात आली. ईशांत जनबंधू, हर्षल घोरमोडे यांनीही महिलांच्या सक्षम नेतृत्वाला उजाळा दिला. सौ. शालिनीताई चौधरी पोलिस पाटील यांनी स्त्रियांना एक दिवस पुरता सन्मान न देता आयुष्यभर तिला मानाने जपायला हवे, सन्मान देणे काळाची गरज असल्याचे सांगीतले, स्पर्धेच्या निमित्ताने महिलांच्या कार्यकर्तृत्व विषयी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये एकेचाळीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. मुकेश, ऋतिक, आदित्य गुरनुले, या विद्यार्थ्यांनी वेशभूषेचे प्रथम पारितोषिक तर ज्ञानेश्वरी, प्राची गुरनुले, समीक्षा उईके या विद्यार्थिनींनी प्रथम पारितोषिक पटकावत सर्वांचे आपल्याकडे लक्ष वेधले. ग्रा.पं. सरपंच कल्लूताई नेवारे, तुळशीफुला गुरनुले, बेबीताई उईके, सत्यभामाताई नंदपूरकर यांनीही उपस्थिती दर्शवित विद्यार्थ्यांच्या बालसभा उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.