छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्यात यावा, रिपब्लिकन पक्ष खोरिपाची मागणी

58

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दर्शनी भागात छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्यात यावा रिपब्लिकन पक्ष खोरिपाची मागणी 

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्यात यावा
रिपब्लिकन पक्ष खोरिपा ची मागणी

मीडिया वार्ता न्युज
१५ मार्च, मुंबई:  वीस वर्षांपूर्वी व्हिक्टोरिया टर्मिनस (व्हि टी) ह्या मध्य रेल्वेच्या अतिशय महत्त्वाचे हेरिटेज दर्जा असलेल्या रेल्वे स्थानकाचे नांव बदलून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असे करण्यात आले आहे मात्र छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बोरिबंदर मुंबई येथे दर्शनी भागात दिसेल अशा ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा बसविणे आवश्यक होते मात्र अद्याप पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्यात आलेला नाही.

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे मुंबई मध्ये दररोज लाखो लोक येत असतात त्यात परदेशी पर्यटक सुद्धा असतात शिवाय देशाच्या विविध राज्यांतील लोक नोकरी, व्यवसाय करण्यासाठी मुंबई मध्ये येत असतात. तसेच महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील जनता मुंबई मध्ये कामानिमित्त येत असतात ह्या सर्व जनतेला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा दिसला पाहिजे करीता.

हे आपण वाचलंत का?

 

दर्शनी भागात छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्यात यावा अशा मागणीचे पत्र रिपब्लिकन पक्ष खोरिपा मुंबई प्रदेशच्या वतीने मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापक यांना मुंबई प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांनी दिले आहे.

https://www.instagram.com/p/CbGE28qtDCl/

देश – विदेशातील बातम्यांच्या अपडेटसाठी मीडियावार्ताच्या इंस्टाग्राम अकाउंटला आजच फॉलो करा.