” महाबोधी शिक्षण संस्था येथे भारत – तिबेट मैत्री संघातर्फे भंडारा जिल्हा तिबेटी जनक्रांती दिन साजरा “
✍ भवन लिल्हारे ✍
* भंडारा उपजिल्हा प्रतिनिधी *
📱 ८३०८७२६८५५ 📱
📞 ८७९९८४०८३८ 📞
भंडारा :- भारत तिबेट मैत्री संघ भंडारा जिल्हा च्या वतीने दिनांक१० मार्च२०२२ रोज गुरुवारला तिबेटी जनक्रांती दिवश महाबोधी शिक्षण संस्थेत आयोजित करण्यात आला होता.
हा कार्यक्रम माझी नगराध्यक्ष मा. श्री. मनोहर गनविर यांच्या अध्यक्षते खाली आठवले समाज कार्य महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. देवेन्द सोनटक्के, मा. श्री. अमृत बन्सोड ( भारत तिबेट मैत्री संघ राज्य महासचिव ) प्राचार्य सचित गभने, महाबोधी चे सचिव शब्बीर शेख, प्रतिष्ठित कलावंत प्रतिष्ठान विदर्भ अध्यक्ष महेंद्र वाहने, प्रा. नितेश शहारे, अर्जुन गोडबोले सामाजिक कार्यकर्ते आहुजा डोंगरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रसंगी वक्त्यांनी तिबेट मधील वर्तमान परिस्थिती विषद करूण निबेट हा स्वतंत्र देश असतांनाही विस्तारवादी व दमनकारी चिनने आपल्या लस्करी सामर्थ्याचा जोरावर१९४९ मध्ये अंशतः व१९५९ मध्ये पूर्णतः कब्जा करून संपुर्ण निबेट गिळंत केले,
या विरुद्ध१० मार्च हा तिबेटी जनक्रांती दिवश तसेच निबेरी दिवश म्हणुन सुद्धा पाळण्यात येतो. असे सांगीतले विशाव्या शतकात जेंव्हा जगातील बहुतेक देश स्वतंत्र होत होते. तेव्हा साम्राज्यवादी विस्तारवादी चिनने निबेटवर आक्रमण करून तिबेटला गिळंकृत केले.
एवढेच नव्हे तर एक विसाव्या शतकातही तिबेटला गुलाम बनवून ठेवले आहे. जगातील स्वातंत्राचे पुरस्कर्ते व शांतिप्रीय लोकांकरीता एक मोठे आव्हाहन आहे. हे आव्हाहन जगांनी स्विकारतानाच भारतीयांनी शुद्धा निबेटी मुक्ती साधनेच्या आंदोलनात सहकार्य करण्याचे आव्हान अमृत बन्सोड यांनी केले. तिबेटच्या स्वातंत्रा करिता आत्मदहन करुण बलीदान देणाऱ्या निबेटीयन गायीका त्सेवांग नोरने शहीद झालेल्या सर्व क्रांतीकारकांना श्रद्धांजली देण्यात आली.