अनुयायांची आंधळी श्रद्धा मिळवून देणारी भोंदूबाबांची काळी जादू आणि त्यामागचे विज्ञान

63

दुर्दैव म्हणजे निरक्षर माणसांसोबतच शिक्षित माणसे, तरुण पिढी देखील अशा बुआ बाबांच्या विळख्यात येण्याची संख्या वाढत असल्याने, ह्या गोष्टीकडे शासन आणि पोलीस प्रशासनाने गंभीरतेने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.

अनुयायांची आंधळी श्रद्धा मिळवून देणारी भोंदूबाबांची काळी जादू आणि त्यामागचे विज्ञान

मीडिया वार्त न्युज
१५ मार्च, मुंबई: श्रद्धा आणि अंधश्रद्धेमध्ये तसा फार मोठा फरक असतो. परंतु आधुनिकतेकडे वेगाने प्रवास करणाऱ्या भारतीयांना हा फरक बहुतेक वेळा कळून येत नाही. याचा पुरेपूर फायदा स्वयंघोषित गुरु, बाबा घेतात आणि अंधश्रद्धेवर आदरलेली आपली साम्राज्य उभी करतात. ह्या ताकदीचा वापर करून पुढे हे भोंदू बाबा आर्थिक घोटाळे, अनुयायी स्त्रियांवर अत्याचार करतात आणि राजकीय ताकदीच्या जोरावर अनेकवेळा या गुन्ह्यांतून सहीसलामत बाहेर पडतात. तरीही लोकांची त्यांच्यावरील आंधळी श्रद्धा काही कमी होत नाही. गेल्या दशकांत अश्या अनेक बाबा- गुरूंचा भारतात उदय झालेला आपण पहिला आहे.

अनुयायांची आंधळी श्रद्धा मिळवण्याची भोंदू बाबांची पहिली पायरी असते ती म्हणजे चमत्कार आणि काळी जादू करून दाखवणे. जराशी चौकस बुद्धी आणि निरीक्षण केल्यास यामागचे वैज्ञानिक कारण समजून येतात. काय असतात त्या काळ्या जादू आणि चमत्कारा मागची वैज्ञानिक कारणे. 

कुंकू काळे करण्याची जादू : कूंकुवामध्ये हातचलाखीने निरमा पावडर टाकली जाते. निरमा पावडरमध्ये अल्कली असते. त्यामुळे अल्कलीची कूंकुवासोबत प्रतिकिया होऊन कुंकू काळे होते. अश्याच केमिकल प्रक्रियेचा वापर करून हळदीचा रंग बदलून दाखवता येतो.

वस्तू गोड करणेसॅकरिन हा पदार्थ साखरेपेक्षा गोड असते. त्यामुळे याचा वापर भोंदू बाबांकडून भक्तांना प्रसाद किंवा इतर वस्तू देताना केला जातो. बाबांच्या हातची कोणतीही गोष्ट गोड लागते, ह्या भोळ्या अंधश्रद्धेखाली असलेल्या लोकांना मात्र या गोष्टीचा गंध नसतो.

हे आपण वाचलंत का?

 

लिंबातून रक्त काढणे: लिंब कंपन्यांच्या सुरीला पोटॅशियम परमॅग्नेट लावल्यास किंवा जास्वदांच्या फुलाला सुरीवर चोळून मग त्याने लिंबू कापल्यास सुरीवरील द्रव्याचे लिंबाच्या रसासोबत रासायनिक प्रक्रिया होऊन लाल द्रव पदार्थ तयार होतो. भोंदू बाबा याचा वापर लिंबातून रक्त येत असल्याचे भासवून लोकांना फसविण्यासाठी करतात.

पाण्याचा दिवा पेटविणे: दोन हायड्रोजन आणि एक ऑक्सिजनचा अटॉम मिळून पाणी तयार होते, जे अग्निरोधक असते. परंतु पाण्यामध्ये जेंव्हा कॅल्शिअम कार्बाईडचे खडे टाकल्यावर पाण्याच्या पृष्ठभागावर असिटीलीन वायूचा थर जमा होतो. हा वायू अत्यंत ज्वलनशील असतो. याचा वापर करूनच भोंदू बाबा पाण्याने पेटलेले दिवे पेटवत असतात.

यांसारख्या अनेक छोट्या-मोठ्या रासायनिक प्रक्रियांचा वापर करून भोंदू बुआ-बाबा लोकांची फसवणूक करतात. दुर्दैव म्हणजे निरक्षर माणसांसोबतच शिक्षित माणसे, तरुण पिढी देखील अशा बुआ बाबांच्या विळख्यात येण्याची संख्या वाढत असल्याने, ह्या गोष्टीकडे शासन आणि पोलीस प्रशासनाने गंभीरतेने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.

https://www.instagram.com/p/CbGE28qtDCl/

 

देश – विदेशातील बातम्यांच्या अपडेटसाठी मीडियावार्ताच्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा.