प्रांताधिकारी यांना आदिवासी एकलव्य संघटनेच्या वतीने आदिवासी भिल्ल समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले
ईसा तडवी
मिडिया वार्ता न्युज
पाचोरा तालुका प्रतिनिधी
मो. 9860884602
पाचोरा : – आज दिनांक : १५/०३/२०२२ वार मंगळवार रोजी एकलव्य संघटना संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष मा.श्री.पवनराजे सोनवणे साहेब यांच्या आदेशानुसार व प्रदेश कार्याध्यक्ष मा.सुधाकरराव वाघ साहेब यांच्या प्रमुख उपस्थिती आज भुसावल व मुक्ताईनगर येथील विभागीय प्रांतकार्यालय भुसावळ येथे. प्रांताधिकारी यांना एकलव्य संघटनेच्या वतीने आदिवासी भिल समाजासाठी अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या प्रमुख मागण्यांसाठी आज निवेदन देण्यात आले. १) आदिवासी भिल समाजासाठी शासन जीआर नुसार आदिवासी भिल समाज राहात असलेल्या प्रत्येक गावामध्ये दफनभूमी उपलब्ध करुन आदिवासी भिल समाजदफनभूमी जागा असा उल्लेख करून ७/१२ उताऱ्यावर नोंद करण्यात यावे. २) आदिवासी भिल समाज राहत असलेल्या जागा नावे करून त्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा व ज्या लाभार्थ्यांचे नाव घरकुल यादीत असून त्यांच्या नाव जागा नाही अश्या लाभार्थ्यांना शासन जिआर नुसार जागा उपलब्ध करून देण्यात यावे. ३) आदिवासी भिल समाज कसत असलेल्या वन जमीन व गायरान जमिनीचा ७/१२ उताऱ्यावर नोंद करून मालकी हक्क मिळावा. ४) आदिवासी भिल समाजाला जातीचे प्रमाणपत्र व रेशनकार्ड राजस्व अभियान योजने अंतर्गत घरपोच देण्यात यावे. ५) एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय यावल याची उपशाखा जळगांव येथे सुरु करण्यात यावी. ६) शबरी वित्त विकास महामंडळा मार्फत सुशिक्षित बेरोजगार आदिवासी तरुण व महिलांसाठी विविध योजनांचा लाभ दोन ते तीन महिन्याच्या आतच देण्यात यावा. ७) शबरी घरकुल योजनेचा उदिष्ट वाढवून मिळावा असे निवेदन प्रांताधिकारी साहेब यांना देण्यात आले यावेळी निवेदन देतांना एकलव्य संघटना प्रदेश कार्याध्यक्ष मा.सुधाकरराव वाघ साहेब जळगांव जिल्हाध्यक्ष (जळगांव लोकसभा) मा.संजुबाबा सोनवणे जळगांव जिल्हाध्यक्ष (रावेर लोकसभा) मा.निवृत्ती पवार युवा जिल्हाध्यक्ष मा.रविभाऊ सोनवणे एकलव्य संघटना उपजिल्हाध्यक्ष ( रावेर लोकसभा ) मा.संजय वाघ भुसावळ तालुकाध्यक्ष मा.राजेंद्र वाघ जिल्हा संघटक मा.पिंटू सोनवणे जिल्हा युवा कार्याध्यक्ष मा.समाधान जाधव मुक्ताईनगर तालुका कार्याध्यक्ष मा.तुकाराम भिल जळगांव तालुकाध्यक्ष मा.मंगल सोनवणे जळगांव महानगराध्यक्ष मा.राहूल ठाकरे भुसावळ तालुकाध्यक्ष श्री.अजय मोरे व आदिवासी भिल समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.*