” मुंढरी खुर्द येथे रानडुकराच्या हल्यात महाराष्ट्र ग्रामीन रोजगार हमीचे मजुर गंभीर जखमी “
✍ भवन लिल्हारे ✍
* भंडारा उपजिल्हा प्रतिनिधी *
📱 ८३०८७२६८५५ 📱
📞 ८७९९८४०८३८ 📞
मोहाडी :- भंडारा जिल्हा मोहाडी तालुक्यातील मुंढरी खुर्द या गावात दिनांक १६ मार्च २०२२ रोज सोमवारला महाराष्ट्र राज्य ग्रामीण हमी योजनेअंतर्गत मुंढरी खुर्द येथील नाला सरळीकरण करण्याचे काम सुरू केले आहे.
या कामावर सुमारे ३०० मजुर आहेत. सोमवारी दुपारच्या सुट्टी नंतर जेवन करुण मजुर कामावर गेले असता, अचानक काम सुरु असतांना नाल्यात लपुन बसलेला रानडुक्कर याने हल्ला केला,
त्यात श्री गणेश बाळकृष्ण नेरकर वय ४६ वर्षे रा. मुंदरी खुर्द हे गंभीर जखमी झाले. गणेश च्या दोन्ही मांड्यांना रानडुकराने चिरडून टाकले आहे, त्या मजुराला करडी प्राथमीक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. तेथे प्राथमि उपचार किल्या नंतर त्याला भंडारा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या प्रकरणी तुमसर वन अधिकाऱ्यांनी मौका चौकशी करून अहवाल तयार करण्यात आलेला आहे, या प्रकरणात गंभीर झालेल्या मजुराला म्हणजे श्री गणेश नेरकर याला नुकशान भरपाई द्यावी अशी मागणी सरपंच रामभाऊ नेरकर आणि मजुरांनी केली आहे. रानइकराने हल्ला केल्याने मजुरामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पुढील तपास तुमसर वन विभागाचे अधिकारी करित आहे.