पोलीस स्टेशन कोरपना मार्फत भव्य आरोग्य तपासणी शिबिर 260 रुग्णांनी घेतला लाभ
*प्रथम तेलंग चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी मो नंबर 7020016684*
कोरपना : -पोलिस स्टेशन कोरपना यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत रोगनिदान शिबीर या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन १६ मार्च रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कोडशी येथे करण्यात आले होते.
चंद्रपूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अरविंद साळवे तसेच अप्पर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेच्या आरोग्याचे निदान व्हावे. त्यांना वेळीच उपचार मिळावा तसेच स्त्रिया व बालकांच्या आरोग्याची काळजी घेता यावी व सामान्य जनतेला योग्य उपचार मिळाल्यास त्यांचे आरोग्य सुद्दढ राहील व त्यांना योग्य निरोगी जिवनमान जगण्यास मदत होईल या उदात्त हेतूने मोफत रोगनिदान शिबीर वैद्यकीय अधिकार्यांच्या साहाय्याने आयोजित करण्यात आले होते.
सदर शिबिराचा लाभ परिसरातील २6० रुग्णांनी घेतला आहे,
ज्यामध्ये अस्थिरोग तज्ञ, बाल रोग तज्ञ ,स्त्री रोगतज्ञ,नेत्ररोग तज्ञआणि इतर डॉक्टरच्या चमुनी चार260रुग्णावर तपासणी केल्यावर मोफत औषधोपचार करण्यात आला
आयोजकांकडून रुग्णासाठी जेवनाची पण सोय करण्यात आलि होति शिबिर यस्वशी करण्यासाठी पोलिस स्टेशन कोरपना चे ठाणेदार सदाशिव ढाकणे, कुडावले मेजर संजय शुक्ला पोलीस कान्स्टेबल इतर गणेश डवरे अविनाश ठोके व ईत़र पोलीस कर्मचारी रुग्णसेवक दिनेश राठोड , पोलीस पाटील जगणाळे आणि,कर्मचारी वृंद जिल्हा परिषद शाळा कोळशी व ग्रामस्थ यांनी मोलाची कामगिरी पार पाडली.